शीशा हो या दिल......
शीशा हो या दिल आखिर टूट जाता है ……
माझे अतिशय आवडते गाणे. परवा अचानक एफेम गोल्ड वर कानी पडले . गाणे अगदी तोंडपाठ, तरी परवा ऐकताना अचानक नव्याने जाणवले की हे गाणे अतिशय निराशावादी आहे. कुठेही एकही ओळ आशा दाखवत नाही. आणि तरीही चित्रपटाचे नाव मात्र 'आशा'. गंमतच आहे ना.
निराशावादी असले तरी काव्य खूप चांगले आहे.
जुन्या चित्रपटांमध्ये सगळा मामला अगदी सरळ असायचा. गाणी हा चित्रपटाचा एका महत्वाचा भाग होता. कित्येक चित्रपट केवळ सुंदर गाण्यांमुळे तरले असा इतिहास वाचायला मिळतो. चित्रपटाच्या सुरवातीलाच हे गाणे येते. चित्रपट कुठल्या वळणाने जाणार हे अगदी लख्खपणे सांगायचे काम हे गाणे करते. "आशा" मधली सगळी गाणी सुरेख आहेत. आनंद बक्षीच्या काव्याला लक्ष्मिकांत-प्यारेलालनी तितकीच सुमधुर चाल लावलेली आहे.
शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है
लब तक आते आते, हाथों से सागर छूट जाता है
काफ़ी बस अरमान नहीं, कुछ मिलना आसान नहीं
दुनिया की मजबूरी है, फिर तकदीर ज़रूरी है
ये जो दुश्मन हैं ऐसे, दोनो राज़ी हो कैसे
एक को मनाऊँ तो, दूजां रूठ जाता है
बैठे थे किनारे पे, मौजों के इशारे पे
हम खेले तूफ़ानों से, इस दिल के अरमानों से
हम को ये मालूम न था, कोई साथ नहीं देता
माज़ी छोड़ जाता है, साहील छूट जाता है
दुनिया एक तमाशा है, आशा और निराशा है
थोड़े फूल है, काँटे है, जो तकदीर ने बाटे है
अपना अपना हिस्सा है, अपना अपना किस्सा है
कोई लूट जाता है, कोई लूट जाता है
यातली शेवटची ओळ नेहमी डोक्यावरुन जायची. लिहिणा-याला सुचले नाही की काय म्हणुन ओळ परत घेतली? आणि एरवी शब्दाबाबत आग्रही असणा-या लताबाईही कशा काय गाऊन गेल्या तीच ओळ?
एके दिवशी अचानक डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
कोई लूट जाता है - कोणी लुटला जातो
कोई लूट जाता है - कोणी लुटून जातो
आणि हा प्रकाश पडल्यावर हे गाणे अजुनच आवडायला लागले. कुठेतरी वाचलेले की आपण आनंदात असताना गाणे ऐकतो तेव्हा त्यातले फक्त संगीत ऐकायला येते, दु:खात असताना गाणे ऐकतो तेव्हा त्यातले काव्य कानावर पडते. अशाच कुठल्यातरी मनस्थितीत ह्या गाण्यातले काव्य माझ्या कानावर पडले असणार.
एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थाने एकाच गाण्यात वापरल्याची खुप उदाहरणे आहेत. नेटवर शोधले तर काही लेखही सापडतील. पण हे गाणे मात्र त्यात कुठेही येत नाही.

टिप्पण्या