लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

हल्ली माझे चालणे खूप कमी झालेय.  पहिल्यासारखे नियमित जाणे होत नाही व त्यामुळे ह्या ऋतूत पारसिक हिलवर फुलणारी फुले पाहिली गेली नाही.
असेच एकदा चुकून चालायला गेले होते.  आदल्या दिवशी जिप्सीने अडुळश्याची फुले व्हाट्सअप्प ग्रुपवर टाकली होती.

टेकडीवर अडुळसा कुठे आहे हे मला माहित आहे म्हणून विचार केला की आपणही एक फेरी मारून फोटो काढावेत.  अडुळश्याचे फोटो काढून परत रस्त्यावर येत असताना एका लहान झाडाने लक्ष वेधून घेतले.  झाडाची उंची साधारण सहा ते सात फूट होती व अगदीच बाळ झाड वाटत होते.  लक्ष गेले ते त्याच्या फुलांमुळे.  अगदी पिटुकली, माचीस काडीच्या डोक्याएव्हढी फुले बघून लगेच फोटो घ्यायला सुरुवात केली.

















घरी गेल्यावर थोडी शोधाशोध केली तेव्हा कळले की हा लघु अजान.

बोटॅनिकल नाव इहरेटिया लेविस.  Ehretia Laevis. ह्या बोटॅनिकल नावांची एक गंमत आहे. झाडाचे नाव व झाडाची पहिल्यांदा नोंद करणारी व्यक्ती या दोघांचीही गुंफण नावात घातलेली असते.  जॉर्ज  डायनिसिअस एऱ्हेट या बोटॅनिकल कलाकाराने पहिली नोंद केली म्हणून एर्हेटिया व लेविस म्हणजे गुळगुळीत.  हे विशेषण बहुतेक गुळगुळीत फळांवरून पडले असावे.

याला मराठीत लघु अजान व धतरंग ही नावे आहेत.  वढवारडी, चामरोड, चर्मवृक्ष ही अन्य भाषेतील नावे.


हा देशी वृक्ष आहे, आशिया खंडात सर्वत्र आढळतो.  भारतातही तो आसेतुहिमाचल सर्वत्र आढळतो.


नावाप्रमाणेच हा वृक्ष लघु आहे. याची वाढ भराभर होते, याचा बहर तीन चार महिने टिकतो व  या दरम्यान झाडाखाली मस्त पांढरा शुभ्र सुगंधी सडा पडलेला दिसतो. या वैशिष्ट्यामुळे उद्यानात किंवा घराशेजारी लावण्यासाठी हा वृक्ष एकदम बेस्ट.


टिप्पण्या

Sadhana म्हणाले…
तुम्हाला बेलापूर अपोलो हॉस्पिटल मागची पारसिक टेकडी माहीत आहे? त्या बाजूने वर गेलात तर वर एक बसायची जागा आहे जिथून अपोलो हॉस्पिटल व त्याच्या समोरचा भाग दिसतो. तिथेच हे झाड आहे.
Thank you, very much. I am engineer & work at Rashtriya Chemicals & Fertlizers Ltd. 9869212521,I am interested to see this Laghu Ajan vruksh. We also have special team of taxonomy scientists in RCF. Its very unique tree.Needs to be preserved carefully. One is also at Dnyneshwar mandir, at Chaitya bhoomi and also at Halfkeen institute. But they are more than 12/15 feet height.I even have one small sample at home. Can i speak to you for more precise location details & before that tree leaves that place.
Sadhana म्हणाले…
Don't worry, the tree won't leave the place. You may visit the tree anytime. Currently it's flowering and fruiting season. Other day I saw this tree in aurangabad near ajintha caves.
अनामित म्हणाले…
छान लिहिलंय..
माझ्या बागेतही लावेन आता हा वृक्ष ..
Omee म्हणाले…
मॅडम हा वृक्ष कुठे याचा संपूर्ण ऍड्रेस द्या मला खूप काम आहे या झाडाच्या पानांचं ते मला कुठेच मिळालं नाही म्हणू न कृपया संपूर्ण पत्ता द्या , गाव , जागा , तालुका , जिल्हा वगैरे ।

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda

मग मी मूर्ख कसा?