पोस्ट्स

माझ्या बकेट लिस्टचा प्रवास

  बकेट लिस्ट हा शब्दप्रयोग मला अगदी अलीकडच्या काळात कळला. त्या आधी माझ्या फक्त इच्छा होत्या. इच्छा हा शब्दही मी चुकीचाच वापरतेय. जे काही होते त्यातल्या काहीना मुंगेरीलाल के हसीं सपने म्हणायला हवे. थिंक बिग ड्रिम बिग वगैरे मोटीवेशनल स्पिकरवाल्यांच्या बाता कानांना कितीही गोड वाटल्या तरी जर्रा फुलके आफताब नही होता हेच खरे. कित्येक इच्छा मनात चक्कर मारुन गेल्या. काही टिकल्या, काही विरल्या. काही पुर्त झाल्या, काहींची अपुर्तता आजही काळजात कळ ऊमटवते तर काही इच्छा नुसत्या आठवल्या तरी ‘ बाल बाल बच गयी मै...’ हे फिलींग येऊन आपण किती सुखात आहोत याची जाणिव मन को बाग बाग बना देती है.. काही सुप्त, काही अतीसुप्त तर काही दिवसातुन दहा वेळा तोंडुन वदल्या जात होत्या. सुप्त अतीसुप्तांचा मलाच पत्ता नव्हता. ज्या दिवसभर घोकल्या जात होत्या त्या प्रत्यक्षात न ऊतरण्याची हजार कारणे घरचे लगेच दाखवुन देत होते. (आमच्याकडे ह्या बाबतीत अजिबात हयगय केली जात नाही). तर अशीच टेरेस फ्लॅटची इच्छा मनात सुप्तावस्थेत होती. जमिनीपासुन वर कुठलाही मजला, घरातील प्रशस्त हॅाल व त्याच्या समोर अतीप्रशस्त अशी टेरेस, त्यावर सुंदर झोपाळ

गारंबीची बी

इमेज
आज अकस्मात गारंबीची बी पहावयास मिळाली. हिला गायरी असेही म्हणतात.  ह्याची जी वेल असते ती साधीसुधी नसते तर महावेल असते.  शास्त्रीय भाषेत Liana म्हणतात त्या प्रकारची प्रचंड वेल, जी साधारण जंगलात उंच वृक्षांवर चढलेली आढळते.  ह्याची शेंगही काही फूट लांब असते.  अजून ही वेल प्रत्यक्ष पहायचे भाग्य मला लाभलेले नाही.   शास्त्रीय नाव Entanda rheedii किंवा Entanda Puesartha. एप्रिल २०२२चा अपडेट :  मी वर लिहिलेय कि हा वेल मला  अजून पाहायला मिळाला नाहीय.  तेव्हा  पाहिला नव्हता पण आता पाहिलेला आहे.   आंबोलीत कायमच्या  मुक्कामाला आल्यावर आंबोली घाटातून  सावंतवाडी फेऱ्या वाढल्या.  अशाच एका फेरीत मला एका १० मजली झाडावर  काहीतरी  टांगलेले  दिसले.   इतक्या उंचीवर दिसतेय  म्हणजे कुठल्यातरी  मोठ्या पक्ष्याने  घरट्यासाठी म्हणून मोठे फडके  नेऊन तिथे टाकले असणार असे मला  वाटले.  पण तरी खात्री करण्यासाठी म्हणून  पुढच्या वेळेस दुर्बीण   घेऊन गेले व बघते तर  ते  फडके नव्हते तर एक  मोठी काळी  शेंग झाडावर लटकलेली दिसली.  शेंग  पाहिल्यावर  ती गारंबीची शेंग याची खात्री  पटली. गारंबीचा महावेल   त्या झाडावर च

आनंदाचे फळ

इमेज
आज मला आनंदी आनंद गडे असे झालेय. लेक व मी दोघींनी आनंद साजरा करूनही तो अजून भरपूर उरलाय. तो आता सर्वत्र वाटतेय. घरचा सगळा कचरा घरच्या कुंड्यांमध्येच जिरवायची सवय. त्यामुळे माझ्याकडे कायम पपई, सीताफळ, आंबा वगैरे मंडळी रुजून येतात. त्यात पपई व सीताफळ तर भरपूर, आज बिया टाकल्या की आठवड्यात रोप हजर. माझ्याकडे आता फारसे ऊन नसल्याने मी ही रोपे अगदी लहान असतानाच काढून टाकते, तरी काही चुकार रोपे तशीच राहतात. ही सगळी जनता स्वतःहून उगवलेली असल्यामुळे कुंडीमालक वेगळे झाड असते आणि हे पोट भाडेकरू. असेच कण्हेरीच्या कुंडीत एक सिताफळाचे रोप राहून गेले. कण्हेरीच्या पसाऱ्यात मला ते आधी दिसले नाही, फूटभर वाढल्यावर दिसायला लागले आणि इतके वाढलेले काढायला जीव झाला नाही. मग ते तसेच राहिले. किती वर्षे झाली देव जाणे. चार पाच वर्षे नक्की झाली असतील. मी त्याला कितीदा छाटलेही असेन. झाड साधारण तीन फूट उंच व चारपाच फांद्या असे रूप आहे. कण्हेरीसोबत राहतेय. गेल्या वर्षी सीताफळाला फुले लागली होती पण ती सगळी बारकुंडी नर फुले होती. त्यांना सिताफळे लागणार नव्हती. यंदा मार्च- एप्रिलपासून मांसल पाकळ्यांची मोठी फुले यायला ला

जुने ते सोने

व्हात्साप युनिव्हर्सिटीच्या सागरात कधीकधी मोती पण सापडतात.  असाच एक आवडलेला मोती. कावळे -  गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे  कावळे. काहीजण तेलाच्या चोचीवाल्या भांड्यालाही कावळा म्हणतात कोरड्यास -  पातळ भाजी आदण - घट्ट भाजीचा रस्सा त्याला  आदण म्हणत. कढाण - मटणाचा पातळ रस्सा त्याला कढाण म्हणतात. घाटा - हरभर्‍याच्या झाडाला ज्यामध्ये हरभरा तयार होतो त्याला घाटा म्हणतात. हावळा - हरभरा तयार झाला की शेतातच काट्याकुट्या गोळा करुन त्यात हरभरा भाजून खायचा त्याला हावळा म्हणतात. कंदुरी - पूर्वी लग्नानंतर किंवा एखादा नवस असेल तर देवाला बकरं कापलं जायचं व ते खाण्यासाठी गावातील लोकांना जेवायला बोलवायचे. बकर्‍याचा कोणताही भाग अथवा त्याची तयार केलेली भाजी घरी आणायची नाही त्याला कंदुरी म्हणत. हुरडा - ज्वारी तयार होण्यापूर्वी थोडीशी हिरवट कणसं भाजून ती चोळून त्यातून जे दाणे निघतात ते खायला गोड असतात. त्यास हुरडा म्हणतात. आगटी - हुरडा भाजण्यासाठी जमिनीत थोडासा खड्डा खोदून त्यात शेणकूट टाकून कणसं भाजली जातात त्याला आगटी म्हणतात. कासूटा, काष्टा

सुभाषितमाला

सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः । अर्धेन कुरुते कार्यम् सर्वनाशो न जायते ॥ विनाश जवळ आल्यावर बुद्धिमान अर्ध्याचा त्याग करतात (अर्ध्यागोष्टी सोडून देतात) आणि (राहिलेल्या) अर्ध्यामधे काम भागवतात, त्यामूळे सर्वनाश होत नाही. न कश्चिदपि जानाति किं कस्य श्वो भविष्यति । (अतः श्वः करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान् ॥ कोणाचे कधी काय होईल हे कोणालाच माहीत नसते. म्हणून हुशार माणसाने कामे लगेच करावी (उगाच कर्तव्यात चालढकल करू नये.) (संकलित)

सुभाषितमाला

लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः। कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेन् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत्॥                                नीतीशतक,  राजा भर्तृहरी. {राजा भर्तृहरिकृत नीतीशतक मूर्खपद्धति विषयविभाग.} वृत्त : पृथ्वी अर्थ :-               (मनुष्याने एकवेळ) प्रयत्नपूर्वक वाळू रगडली अथवा पिळली तर त्यातून कदाचित तेलही मिळेल, (अथवा) तहानेने व्याकूळ झालेला माणूस आपली तहान मृगजळाच्या पाण्याने देखील भागवू शकेल, वणवण भटकणार्‍या (एखाद्याला) फिरतां फिरतां चुकून कदाचित सशाचें शिंगसुद्धां सापडेल. (इतक्या सर्व अशक्य गोष्टी वाटणार्‍या गोष्टीही कदाचित साध्य होतील) परन्तु पुर्वाग्रही, हट्टी, हेकट अश्या मूर्खाची समजूत घालणे मात्र (कधीही, कोणालाही) शक्य होणार नाही. हे सुभाषित वाचताच मराठी बांधवांना वामनपंडिताने या श्लोकाचा मराठीत केलेला काव्यानुवाद लगेच आठवतो. तो म्हणजे, 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे'.    मूळ श्लोक भर्तृहरीने 'पृथ्वी' वृत्तात लिहिलेला असला तरी गंमत अशी की वामनपंडितांना काव्यानुवाद मात्र '

मग मी मूर्ख कसा?

माझे सातवीपर्यंतचे शिक्षण पालिकांच्या शाळांत झाले.  शिक्षणाचे माध्यम मराठी व्यतिरिक्त अजून काही असू शकते, स्टेट बोर्ड व्यतिरिक्त अजून काही बोर्ड असतात वगैरे माहीत असायचा प्रश्न नव्हताच.  शाळा निवडताना घराच्या जवळ हा एकमेव निकष होता.  सावंतवाडीत, एल्फिन्स्टन रोडच्या घरी किंवा नंतर सांताक्रूझला आल्यावरही ह्याच निकषावर माझी शाळा निवडली गेली.   त्या वेळी साधारण मध्यमवर्गीय लोक, ज्यांच्या घरी शिक्षणाचे वारे वाहात असे, असे लोक मुलांना खासगी शाळांत घालत.  त्यामुळे पालिकांच्या शाळेत बहुतांश निम्न मध्यमवर्गीयांची मुले येत.  बहुतेकांच्या घरी शिक्षणाचे वातावरण नसे.  मुलांनी अभ्यास सोडून इतर कसलीही पुस्तके वाचलेली नसत, तोंडची भाषा अशुद्ध असे, अभ्यासात फारशी गती नसे. अशा मुलांमध्ये माझ्यासारखे मोजके अपवाद, ज्यांच्या घरी शिक्षण हा महत्वाचा विषय असे, जे शालेय पुस्तकांव्यतिरिक्त इतर अवांतर वाचन करीत असत ते वेगळे उठून दिसत.  वासरातल्या लंगड्या गायीच जणू! सध्या पालिकांच्या शाळा कशा चालतात याबद्दल मला काही सांगता येणार नाही कारण तिथे शिकणारे कोणी परिचयात नाही.  पण तेव्हा पालिका शाळांत चांगले शिक्षण