संतवाणी

माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर ।
कर का मन का डार दे, मन का मनका फेर ॥



हातात जपमाळ फिरवत फिरवत किती युग लोटले कुणास ठाऊक,  पण अजुनही मन काही साफ झाले नाही.  हातातली ती खोट्या मण्यांची माळ फेकुन दे आणि मनाच्या मण्यांची माळ फिरवायला घे.   मग बघ मन साफ होते की नाही ते.


संत कबीरांनी किती छान सांगितलेय. आणि सांगताना शब्दांशी काय खेळ खेळलाय.  मनका शब्द किती उत्तम त-हेने वापरलाय.



धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥



सगळ्या गोष्टी जेव्हा व्हायच्या तेव्हाच होणार आहेत. माळ्याने आज १०० घागरी पाणी आणुन ओतले म्हणुन झाडाला फुले फळे लागणार नाहीत. ती तेव्हाच लागणार जेव्हा त्यांची लागायची वेळ येणार. तोपर्यंत वाट पाहिलीच पाहिजे.


मला हे वचन खुप आवडते.  कधीकधी आजच्या जगण्याचा खुप कंटाळा येतो. चांगल्या उद्याची जरा जास्तच रंगीबेरंगी स्वप्ने पडायला लागतात.   उद्या जरा जास्त रंगीबेरंगी वाटायला लागला की मग घाई लागते,  तो उद्या आजच उजाडूदे असे वाटायला लागते.  अशा वेळी मी हे वचन मनाला आळवायला लावते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

मग मी मूर्ख कसा?

भाभा अणुशक्ती केंद्रात एक दिवस.....