पोस्ट्स

मे, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नि:शंक - मायबोलीवरून

मायबोलीवर वाचताना बहुतेक वेळा माझ्याकडून  लेखकाचे नाव आधी पाहिले जाते.  नंतर लेखन प्रकार पाहिला जातो.  मग हाती असलेल्या वेळानुसार याआधी  ज्यांचे लिखाण वाचलेय आणि  आवडलेय अशांचे वाचले जाते.   कधीतरी सहज म्हणून पण काहीतरी वाचले जाते.  लेखनप्रकार गजल किंवा कविता असेल तर सहसा उघडले जात नाही.  पण ललित असेल आणि शीर्षक थोडे  वेगळे वाटले  तर कधीकधी उघडले जाते.   "नि:शंक"  हे नाव शीर्षक वाचून काही बोध होईना.  बघू तरी काय आहे हे ललित म्हणून लेख उघडला.    पहिले दोन तीन  तुकडे  वाचून काहीतरी प्रेमाचे आहे असे वाटले आणि मधले सोडत भरभर खाली आले.  प्रेमाचे काहीतरी वाचायचा आता  कंटाळा आलाय.   म्हणजे लिहिणा-यांनी लिहू  नये असे काही नाही.  काही जण खरेच चांगले लिहितात.  पण मी आता ते वाचायच्या कक्षेतून बाहेर आलेय बहुतेक.   प्रेमाच्या गोड गोड गोष्टी वाचताना मला त्यानंतरच्या कडू कडू गोष्टी जास्त आठवायला लागतात.  आणि मग ते सगळेच हास्यास्पद होऊन जाते माझ्यासाठी.    म्हणुन मग मधला  मोठा भाग वाचलाच नाही आणि तसेच शेवटाला पोचले.  शेवटीही वर एकदा आधी आलेले एक गोड वाक्य होते. त्यामुळे पु

जीव्ह्जचे आगमन!!

आता जीव्हजबद्दल बोलायचे म्हणजे , जीव्हज म्हणजे   माझी  व्यक्तिगत कामे पाहणारा हो,  आमचे संबंध नेमके कसे    आहेत ? ब - याच लोकांचे असे म्हणणे आहे की मी त्याच्यावर नको तितका विसंबुन आहे .   माझी अ ‍ ॅगथा मावशी तर त्याला चक्क माझा  मालक  म्हणते . पण मी म्हणतो , का नाही ? तो माणुस  विलक्षण  प्रतिभावंत आहे . तो आल्याच्या आठवडाभरात   दैनंदिन आयुष्यातल्या कटकटींवर स्वतः डोकेफोड करणे  मी  सोडुन दिले . तो आल्याला आता साधारण  सात आठ  वर्षे झाली असतील . साधारणपणे फ्लॉरेन्स क्रेय , माझ्या विलोबीका कांचे पुस्तक अणि स्काऊट एडवीन प्रकरणावेळी तो माझ्याकडे   आला . खरी सुरवात झाली ती मी काकांच्या श्रॉपशायर मधल्या ईजबीला परतलो तेव्हा . साधारण एखादा आठवडा  मी  तिथे घालवणार होतो; दरवर्षी उन्हाळा लागला की मी एखाद्या आठवड्यासाठी  तिथे  जातो . तिथे असताना मला अचानक लंडनला नवा नोकर बघण्यासाठी परत जावे लागले .   ईजबीला सोबत नेलेल्या मिडोज ह्या माझ्या नोकराला माझे  रेशमी  मोजे ढापताना मी रंगे हात पकडले . आणि तुम्हा