पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भाभा अणुशक्ती केंद्रात एक दिवस.....

इमेज
मध्य मुंबई मराठी विज्ञान संघाने आयोजित केलेल्या भाभा अणू संशोधन केंद्रभेटीत सहभागी व्हायची संधी श्री. तुषार देसाई यांच्यामुळे लाभली. अणुशक्तीनगरात वसलेली ही निसर्गरम्य जागा बाहेरून येता जाता कित्येकदा पाहिली होती. पण आत प्रवेश मिळत नाही हे माहीत असल्याने आतला परिसर पाहण्याची खूप उत्सुकता होती. अनासाये संधी मिळतेय म्हटल्यावर मी ऑफिसचे काम बाजूला ठेऊन आधी या संधीचा लाभ घ्यायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ ला बीएआरसिच्या वृंदावन या इमारतीत सगळे जमले. एकूण ४८ उत्साहीजण या कार्यक्रमासाठी आले होते. नेहमीप्रमाणे काहीजण उशिरा आले, त्यांच्यामुळे वेळेत आलेल्या लोकांना खोळंबून राहावे लागले. तिथेच चहा व इडली-वड्याचा आस्वाद घेऊन सगळे निघाले. आत जाण्यासाठी व फिरण्यासाठी बीएआरसीच्य बसची सोय केली होती. नंतर फिरताना एक भगिनी म्हणाली की मुंबईत फिरणाऱ्या या बसेसमधून कधीतरी फिरायला मिळावे ही खूप इच्छा होती जी आज पूर्ण झाली. आता या बसेस कॉम्प्लेक्सबाहेर फिरत नाहीत. बीएआरसीमध्ये अतिशय कडक सुरक्षा तपासणी केली जाते. कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आत नेता येत नाही. मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राइव

फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - घागरिया

इमेज
बसने आम्हाला गोविंदघाटाला नेऊन सोडले. हा रस्ताही आधीच्या रस्त्यासारखा डेंजर आहे. वळणे घेत जाणारा रस्ता: बाकी शिळा वगैरे नेहमीची दृश्ये: गोविंदघाट हे जोशीमठ इतकेच म्हणजे साधारण 6,000 फुट उंचीवर आहे. तिथून 13 किलोमीटर चालत आम्हाला घागरियाला जायचे होते जे साधारण 10,000 फूट उंचीवर होते. म्हणजे आज पायी 4,000 फूट उंच चढायचे होते. हा चढ कसा असणार याची काहीच कल्पना नव्हती. चढून गेल्यावर कळले की पहिल्या 8,9 किलोमीटर मध्ये आपण फारतर 1000-1500 फूट चढून जातो व खरा चढ शेवटच्या 4 किमिला लागतो. आधीचे 9 किमी चालून आपण दमलेलो असतो आणि ह्या दमलेल्या जीवाला अकस्मात 45 अंशाच्या कोनात चढणाऱ्या रस्त्याचा सामना करावा लागतो. 'कुठून झक मारली आणि ह्या भानगडीत पडले' वगैरे विचार भारी दाटून येतात व दमलेल्या जीवाचे अजून खच्चीकरण करतात. आदल्याच आठवड्यात मायबोलीकर इंद्रा तिथे जाऊन आला होता, त्याने 13 किमी ट्रेकच्या भानगडीत न पडता सरळ हेलीकॉप्टरने घागरिया गाठ म्हणून सांगितले होते. दर साधारण 3200 रु प्रति व्यक्ती आहे. इंद्रा तिथे असताना पाऊस होता. पाऊस असला की रस्ता चिखल व खेचरांच्या मलमूत्र विस