पोस्ट्स

असेच काहीतरी सटरफटर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माझ्या बकेट लिस्टचा प्रवास

  बकेट लिस्ट हा शब्दप्रयोग मला अगदी अलीकडच्या काळात कळला. त्या आधी माझ्या फक्त इच्छा होत्या. इच्छा हा शब्दही मी चुकीचाच वापरतेय. जे काही होते त्यातल्या काहीना मुंगेरीलाल के हसीं सपने म्हणायला हवे. थिंक बिग ड्रिम बिग वगैरे मोटीवेशनल स्पिकरवाल्यांच्या बाता कानांना कितीही गोड वाटल्या तरी जर्रा फुलके आफताब नही होता हेच खरे. कित्येक इच्छा मनात चक्कर मारुन गेल्या. काही टिकल्या, काही विरल्या. काही पुर्त झाल्या, काहींची अपुर्तता आजही काळजात कळ ऊमटवते तर काही इच्छा नुसत्या आठवल्या तरी ‘ बाल बाल बच गयी मै...’ हे फिलींग येऊन आपण किती सुखात आहोत याची जाणिव मन को बाग बाग बना देती है.. काही सुप्त, काही अतीसुप्त तर काही दिवसातुन दहा वेळा तोंडुन वदल्या जात होत्या. सुप्त अतीसुप्तांचा मलाच पत्ता नव्हता. ज्या दिवसभर घोकल्या जात होत्या त्या प्रत्यक्षात न ऊतरण्याची हजार कारणे घरचे लगेच दाखवुन देत होते. (आमच्याकडे ह्या बाबतीत अजिबात हयगय केली जात नाही). तर अशीच टेरेस फ्लॅटची इच्छा मनात सुप्तावस्थेत होती. जमिनीपासुन वर कुठलाही मजला, घरातील प्रशस्त हॅाल व त्याच्या समोर अतीप्रशस्त अशी टेरेस, त्यावर सुंदर झ...

जुने ते सोने

व्हात्साप युनिव्हर्सिटीच्या सागरात कधीकधी मोती पण सापडतात.  असाच एक आवडलेला मोती. कावळे -  गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे  कावळे. काहीजण तेलाच्या चोचीवाल्या भांड्यालाही कावळा म्हणतात कोरड्यास -  पातळ भाजी आदण - घट्ट भाजीचा रस्सा त्याला  आदण म्हणत. कढाण - मटणाचा पातळ रस्सा त्याला कढाण म्हणतात. घाटा - हरभर्‍याच्या झाडाला ज्यामध्ये हरभरा तयार होतो त्याला घाटा म्हणतात. हावळा - हरभरा तयार झाला की शेतातच काट्याकुट्या गोळा करुन त्यात हरभरा भाजून खायचा त्याला हावळा म्हणतात. कंदुरी - पूर्वी लग्नानंतर किंवा एखादा नवस असेल तर देवाला बकरं कापलं जायचं व ते खाण्यासाठी गावातील लोकांना जेवायला बोलवायचे. बकर्‍याचा कोणताही भाग अथवा त्याची तयार केलेली भाजी घरी आणायची नाही त्याला कंदुरी म्हणत. हुरडा - ज्वारी तयार होण्यापूर्वी थोडीशी हिरवट कणसं भाजून ती चोळून त्यातून जे दाणे निघतात ते खायला गोड असतात. त्यास हुरडा म्हणतात. आगटी - हुरडा भाजण्यासाठी जमिनीत थोडासा खड्डा खोदून त्यात शेणकूट टाकून कणसं भाजली जातात त्याला आगटी म...

वन मिनिट प्रिंसिपल

दहा दिवस हा प्रयोग सगळयांनी मिळून करायचा आहे. एखादी चांगली सवय जी आपल्याला असायला हवी असं मनापासून वाटतंय पण जमतच नाही, कळतंय पण मन वळत नाही असं वाटतंय. अशी एकच एक सवय, चांगली गोष्ट निवडा. या सवयीचा अक्षरशः लहानसा भाग ठरवा. लहान किती तर अक्षरशः काहीतरीच काय, फक्त इतकंच असं वाटेल, बालिशपणा वाटेल इतका लहान भाग. 1. रोज एका पुस्तकाचं एकच पान. 2. रोज एकच सुर्यनमस्कार. 3. रोज एक योगासन. 4. रोज पाच मिनिट मेडिटेशन. 5. रोज दोन स्पेलिंग पाठ करणे. 6. रोज चांगल्या अक्षरात दोन ओळी लिहिणे. असंच.. कितीही ... काहीही.. या अक्षरशः एका मिनिटाच्या व्रताने पुढे काय बदल होऊ शकेल हे प्रत्यक्ष अनुभवानेच समजून घ्या. कोण कोण एक मिनिटाच्या सवयीत भाग घेतंय? त्यांनी कमेंट जरुर करा. रोज दिवसभरात कधीही एकदा तो एक मिनिट ते ठरवलेलं काम करायचंय. 21 दिवसात साधारण सवय लागते... त्यामुळे संकल्प 21 दिवसांचाच करा. काय आहे वन मिनिट प्रिसिंपल?  Kaizen जपान मध्ये kaizenचा शोध लागला आणि मानवी आयुष्याला जबरदस्त कलाटणी मिळाली. Kai म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपणा.  (Change +Wisdom). आयुष्याला आका...

निसर्ग

इमेज
मला निसर्गात राहायला आवडते.  सिमेंटच्या जंगलात मी गुदमरते.  नशिबाने माझ्या आजूबाजुला निसर्ग मुक्तपणे बागडत आहे.  माझ्या खिडकीतून दिसणारा निसर्ग.....

सकाळचा वॉक

इमेज
हल्ली रोज नियमाने चालायला जाते.  पारसिक टेकडीवर रोज काहीतरी नवीन दृष्टीस पडते. असेच काही फोटो आठवणीसाठी

पाऊस

यंदा पाऊस  व्यवस्थित पडतोय.  उगीच भसाभसा ओतून सगळे वाहून गेलेय असे करत नाहीय तर थांबून थांबून पोटभर पडतोय.  मुंबई स्पेशल गाडी बंद वगैरे प्रकार अजून केले नाहीयेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळीकडे पडतोय. असाच पडत राहा बाबा .....

व्यसन, छंद, टाईमपास.....

इमेज
इंटरनेट ऑफिसात उपलब्ध झाल्यापासून मला त्याचा छंद जडला.  ऑफिसात फुकट मिळायला लागण्याआधीपासून माझ्या घरी व्हिएसेनेलची इंटरनेट सेवा होती. पण इंटरनेटची गंमत मला माहित नव्हती. त्याचा वापर फक्त इमेल पाठवण्याकरता होत असे.  कधीतरी इंटरनेट एक्सप्लोरर उघडून बघायचे पण बातम्या वाचण्यापलीकडे कधी मजल गेली नाही.  काय बघायचे हेच माहीत नव्हते तर ... ऑफिसात लिखित मेमोजचा जमाना संपला आणि इंट्रानेट सुरु झाले.  इंट्रानेट सोबत इंटरनेट कधी आले ते लक्षात नाही पण बहुतेक दोन्ही एकदमच सुरु झाले असावे.  तेव्हा व्हॉट्सअप नव्हते त्यामुळे मित्रमंडळ इमेलवरून संदेशवहन करायचे. तो जमाना हॉटमेल, याहू वगैरेचा होता.  याहू ग्रुप्स फेमस व्हायला सुरुवात झालेली. निडोकिडोज हा एक अतिशय फेमस याहू ग्रुप होता.  बहुतेक सगळे फोर्वर्ड्स ह्या ग्रुपवर जन्माला यायचे.  माझ्या जुन्या पुराण्या बॅकअप वर यांच्या ढिगाने मेल्स सापडतील. तर माझी इंटरनेट सुरवात अशी आधी मेल्स मग याहू ग्रुप्स पासून झाली.  फोर्वर्ड्सवर क्लिक करता करता इंटरनेट हा एक मोठा खजिना आहे हे लक्षात येऊ लागले. मला वाटते मी नेट म...

घावणे...

इमेज
रोज नाश्ता काय हा प्रश्न असतोच.  आज ऐशूची फर्माईश झाली, घावणे कर म्हणून.  माझे घावणे कधी बरे होतात, कधी नाही.  नेहमी तांदूळ भिजवून घावणे करते मी, पण त्याला पूर्वतयारी लागते.  एकदोनदा विकतच्या तयार पिठाचे केले पण नीट सुकलेच नाहीत.  त्यामुळे घावणे कर हा हुकूम आल्यावर जरा धास्तावलेच. गेल्याच आठवड्यात तांदूळ धुवून, सुकवून, दळून आणलेले.  तेच काढले आणि देवाचे नाव घेऊन एका वाटीचे घावणे बनवले.  खाणारणीचे नशीब थोर असल्याने चांगले झाले. घावण्याचा विषय निघाला कि नेहमी आजीची म्हणजे ऐशूच्या पणजीची आठवण निघतेच.  ऐशूला तिच्या हातचे घावणे खूप आवडतात.  गावी गेलो कि एकदा तरी तिच्या हातचे घावणे ऐशू खातेच.  त्याचे असे झाले कि बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा आंबोलीला गेलेलो. आजी एके दिवशी डब्यात घावणे घेऊन भेटायला आली.  अर्थात तिने तिच्या मुलीसाठी आणलेले. तिच्या मुलीने ते स्वतःच्या मुलीला दिले,  त्या मुलीने ते आपल्यामुलीला दिले. अशा  तऱ्हेने घावणे ऐशूपर्यंत पोचले खरे,  पण तिच्या मते पणजीने ते स्वतःच्या चेडवा करता आणलेले, तिच्याकरता नाही. ...

२०१६ - एक मैलाचा दगड!!!!!

या वर्षी ब-याच गोष्टी करायचे ठरवले आहे.   या वर्षी घडणारी  सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे ऐशुचे ग्रेजुएशन. १०+२+३ या साच्यातून  बाहेर पडुन आयुष्याची सुरवात करायची वेळ आलीय.  गेल्या नोवेंबरात मिलिंद पराडकर आणि कुमुद कानिटकरांबरोबर अंबरनाथचे शिव मंदिर पाहायला गेलो होतो.  तिथे बोलता बोलता त्यांनी एक खूप छान  गोष्ट सांगितली.  त्या म्हणाल्या की पदवी  शिक्षण पुर्ण झाल्यावर दीक्षांत समारंभ असतो.    त्याचा अर्थ अभ्यासाचा अंत हा नाही तर कोणीतरी  तुमच्या समोर बसून तुम्हाला शिकवणार आणि मग ते तुम्ही शिकणार या पद्धतीचा  अंत.   यापुढे तुम्हाला कोणी शिकवणार नाही तर तुमचे तुम्ही स्वत: शिकायला लागायचे.   दीक्षांत  झाला म्हणजे असे स्वत:च स्वत: शिकायला तुम्ही तयार झालात. १०+२+३ साचा पार पडल्यावर पुढे काय ह्या प्रश्नावर गेले वर्षभर काथ्याकुट चालू आहे.   तिला सध्या शिकवणा-या शिक्षकांच्या  मते मुंबईत पोस्ट ग्रजुएशन अजिबात करू नये. मग आता मुंबई नाहीतर निदान पुणे तरी चालावे.  इतिहास ह्या विषयासाठी सगळ्...

मावळत्या दिनकरा......

इमेज
रोज अनुदिनी  लिहायची म्हणते तरीही शेवटची  पोस्ट ऑगस्ट मधली…… मावळत्या दिनकराला  नमस्कार करून नवीन वर्षाची सुरवात ….

नि:शंक - मायबोलीवरून

मायबोलीवर वाचताना बहुतेक वेळा माझ्याकडून  लेखकाचे नाव आधी पाहिले जाते.  नंतर लेखन प्रकार पाहिला जातो.  मग हाती असलेल्या वेळानुसार याआधी  ज्यांचे लिखाण वाचलेय आणि  आवडलेय अशांचे वाचले जाते.   कधीतरी सहज म्हणून पण काहीतरी वाचले जाते.  लेखनप्रकार गजल किंवा कविता असेल तर सहसा उघडले जात नाही.  पण ललित असेल आणि शीर्षक थोडे  वेगळे वाटले  तर कधीकधी उघडले जाते.   "नि:शंक"  हे नाव शीर्षक वाचून काही बोध होईना.  बघू तरी काय आहे हे ललित म्हणून लेख उघडला.    पहिले दोन तीन  तुकडे  वाचून काहीतरी प्रेमाचे आहे असे वाटले आणि मधले सोडत भरभर खाली आले.  प्रेमाचे काहीतरी वाचायचा आता  कंटाळा आलाय.   म्हणजे लिहिणा-यांनी लिहू  नये असे काही नाही.  काही जण खरेच चांगले लिहितात.  पण मी आता ते वाचायच्या कक्षेतून बाहेर आलेय बहुतेक.   प्रेमाच्या गोड गोड गोष्टी वाचताना मला त्यानंतरच्या कडू कडू गोष्टी जास्त आठवायला...