पोस्ट्स

जून, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीव्हजचे आगमन! (Jeeves takes charge)

Jeeves takes charge ह्या पी जी वुडहाऊसच्या कथेचा हा अनुवाद. ***************** आता जीव्हजबद्दल बोलायचे म्हणजे, जीव्हज म्हणजे माझी व्यक्तिगत कामे पाहणारा हो, आमचे संबंध नेमके कसे आहेत? ब-याच लोकांचे असे म्हणणे आहे की मी त्याच्यावर नको तितका विसंबुन आहे. माझी अ‍ॅगाथा मावशी तर त्याला चक्क माझा मालक म्हणते. पण मी म्हणतो, का नाही? तो माणुस विलक्षण प्रतिभावंत आहे. तो आल्याच्या आठवडाभरात दैनंदिन आयुष्यातल्या कटकटींवर स्वतः डोकेफोड करणे मी सोडुन दिले. तो आल्याला आता साधारण सात आठ वर्षे झाली असतील. साधारणपणे फ्लॉरेन्स क्रेय, माझ्या विलोबीकाकांचे पुस्तक अणि स्काऊट एडवीन प्रकरणावेळी तो माझ्याकडे आला. खरी सुरवात झाली ती मी काकांच्या श्रॉपशायर मधल्या ईजबीला परतलो तेव्हा. साधारण एखादा आठवडा मी तिथे घालवणार होतो; दरवर्षी उन्हाळा लागला की मी एखाद्या आठवड्यासाठी तिथे जातो. तिथे असताना मला अचानक लंडनला नवा नोकर बघण्यासाठी परत जावे लागले. ईजबीला सोबत नेलेल्या मिडोज ह्या माझ्या नोकराला माझे रेशमी मोजे ढापताना मी रंगे हात पकडले. आणि तुम्हाला माहित आहेच असल्या गोष्टी मीच काय कोणीही अजिबात खपवु