पोस्ट्स

ऑगस्ट, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेरी आवाज सुनो

इमेज
आज ऑफिसला दांडी मारली.  कालपासुन डोके मायग्रेनमुळे दुखत होते.  त्याला थोडा आराम द्यावा म्हणुन आज सुट्टी घेतली.  आज नेहमीसारखे काम काढायचा अजिबात मुड नव्हता.  मग लॅपटॉपवर युट्युबवर गाणी लावली. हा माझा नेहमीचा उद्योग आहे.  गाणी लावुन ठेवायची आणि कामे करत बसायचे.  वाटले तर एखादे गाणे पाहायचे.   आज मोहम्मद रफीची गाणी लावलेली.  प्लेलिस्टमध्ये सगळी शांतरसाची गाणी होती.  हळूवार प्रेमगीते होती सगळी.  बहुतेक सगळी देवचीच होती. :)   गाणी ऐकत, सोबत गुणगुणत,  मध्येच व्हॉट्साप, मायबोली इत्यादी करत टाईमपास चाललेला.   अचानक एक गाणे कानावर पडले.    मेरी आवाज सुनो,  प्यार का राज सुनो.... हे गाणे मी आधी ऐकलेय.  कुठे?कधी?  काहीच आठवत नाही.   पाहिल्याचे तर अजिबातच नाही.  तरीही हे गाणे मी कायम गुणगुणत असते.  फक्त सुरवातीच्या दोन ओळीच मला माहित आहेत आणि त्याच नेहमी गुणगुणते.  मेरी आवाज सुनो,  प्यार का राज सुनो,  मेरी आवाज सुनो. हे गाणे पाहायची संधी पहिल्यांदाच मिळाली आज.  पण पडद्यावर काहीतरी दुसरेच दिसत होते.  पडद्यावर चक्क पंडित नेहरुंच्या अंत्ययात्रेचे आणि तेव्हाच्या एकुण लोकभावनेचे चित्रीकरण

चार्वाक

यावज्जिवेत सुखम जिवेत,  ऋणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मिभुतस्य देहस्य, पुनरागमनं कुतः

दाल लेक, श्रीनगर

इमेज
 

संतवाणी

माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर । कर का मन का डार दे, मन का मनका फेर ॥ हातात जपमाळ फिरवत फिरवत किती युग लोटले कुणास ठाऊक,  पण अजुनही मन काही साफ झाले नाही.  हातातली ती खोट्या मण्यांची माळ फेकुन दे आणि मनाच्या मण्यांची माळ फिरवायला घे.   मग बघ मन साफ होते की नाही ते. संत कबीरांनी किती छान सांगितलेय. आणि सांगताना शब्दांशी काय खेळ खेळलाय.  मनका शब्द किती उत्तम त-हेने वापरलाय. धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय । माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥ सगळ्या गोष्टी जेव्हा व्हायच्या तेव्हाच होणार आहेत. माळ्याने आज १०० घागरी पाणी आणुन ओतले म्हणुन झाडाला फुले फळे लागणार नाहीत. ती तेव्हाच लागणार जेव्हा त्यांची लागायची वेळ येणार. तोपर्यंत वाट पाहिलीच पाहिजे. मला हे वचन खुप आवडते.  कधीकधी आजच्या जगण्याचा खुप कंटाळा येतो. चांगल्या उद्याची जरा जास्तच रंगीबेरंगी स्वप्ने पडायला लागतात.   उद्या जरा जास्त रंगीबेरंगी वाटायला लागला की मग घाई लागते,  तो उद्या आजच उजाडूदे असे वाटायला लागते.  अशा वेळी मी हे वचन मनाला आळवायला लावते.

बालपणीचा काळ सुखाचा.........

बालपणीचा काळ सुखाचा..  माझ्या बालपणातलाच काय आजवरच्या एकुण आयुष्यातला सुखाचा काळ कोणता असा प्रश्न कोणी विचारला तर उत्तर लगेच येईल,  सावंतवाडीतील वास्तव्याचा.  (अर्थात मला असले प्रश्न विचारतंय कोण म्हणा... :) माझा जन्म नगरचा.  मी साताठ महिन्याची असताना आईबाबा आंबोलीला परतले.    आणि मग मी तीन वर्षांची असताना आईबाबा सावंतवाडीला राहायला आले. तोपर्यंत कुटुंबात एका भावाची भर पडली होती. आधी सालईवाड्यात होतो राहायला.  तिथे आमचे स्वतंत्र एकमजली घर होते.  इतर घरे एकमेकांना जोडलेली होती.  तळमजल्यावर बाबा हार्मोनियम पेट्या बनवायचे, तिथेच छोटे स्वयंपाकघर होते आणि वरच्या मजल्यावर झोपायची खोली.  दोघांना जोडणारा एक जिना.  एकदा त्या वरच्या खोलीतुन खाली येताना पहिल्याच पायरीवर माझा पाय घसरला आणि मी पाय-या मोजत थेट खाली.  महिनाभर हात प्लास्टरमध्ये होता.  त्या काळात मी जेवढे शक्य होते तेवढे लाड करवुन घेतले,  धाकट्या भावाला शक्य तितके धपाटे मारुन घेतले. कारण त्या दरम्यान मला कोणीच ओरडत नव्हते. प्लास्टर निघाले त्या दिवशी मी खुप रडले. कारण मी परत सामान्य मुलगी झाले होते.  घरासमोर मोठे सगळ्यांना सामायिक

शीशा हो या दिल......

शीशा हो या दिल आखिर टूट जाता है …… माझे अतिशय आवडते गाणे.   परवा अचानक एफेम गोल्ड वर कानी पडले .  गाणे अगदी तोंडपाठ, तरी परवा ऐकताना अचानक नव्याने जाणवले की हे गाणे अतिशय निराशावादी आहे.  कुठेही एकही ओळ आशा दाखवत नाही.  आणि तरीही चित्रपटाचे नाव मात्र 'आशा'.   गंमतच आहे ना. निराशावादी  असले तरी काव्य खूप चांगले आहे. जुन्या चित्रपटांमध्ये सगळा मामला अगदी सरळ असायचा.  गाणी हा चित्रपटाचा एका महत्वाचा भाग होता.  कित्येक चित्रपट केवळ सुंदर गाण्यांमुळे तरले असा इतिहास वाचायला मिळतो.  चित्रपटाच्या सुरवातीलाच हे गाणे येते.  चित्रपट कुठल्या वळणाने जाणार हे अगदी लख्खपणे सांगायचे काम हे गाणे करते.   "आशा" मधली सगळी गाणी सुरेख आहेत.   आनंद बक्षीच्या काव्याला लक्ष्मिकांत-प्यारेलालनी तितकीच सुमधुर चाल लावलेली आहे. शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है लब तक आते आते, हाथों से सागर छूट जाता है काफ़ी बस अरमान नहीं, कुछ मिलना आसान नहीं दुनिया की मजबूरी है, फिर तकदीर ज़रूरी है ये जो दुश्मन हैं ऐसे, दोनो राज़ी हो कैसे एक को मनाऊँ तो, दूजां रूठ जाता है बैठे थे किनारे पे, मौज

सुदुपार

इमेज

सुप्रभात

इमेज
oxalis stricta हे या पानाचे नाव असे गुगलवर शोधाशोध केल्यावर वाटले.  यलो वुडसॉरेल असेही एक सामान्यनाम याला आहे.  पण याची फुले मला थोडी वेगळी वाटली.  माझ्या कुडीत जे येलो वुडसॉरेल आहेय त्याच्या फुलांचा फोटो काढुन तो नेटवरच्या फोटोंशी ताडुन पाहायला हवा. याला मराठीत काय म्हणतात कोणी सांगेल काय?  

सुप्रभात

इमेज
कधीतरी माझ्या घरी बोगनवेल अशीच चढेल असे स्वप्न रंगवायला काय हरकत आहे??  :)  

सुप्रभात

इमेज
सुप्रभात