पोस्ट्स

डिसेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

म्युझिकल नोट्स प्लांट Clerodendrum Incisum

इमेज
काल ऑफिसच्या आवारात फिरताना दुरून हे 1फुटी झुडूप दिसले.  लांबून फुले मला बुचाच्या फुलांसारखी वाटली.  बुच तर वृक्ष आहे त्यामुळे थोडे आश्चर्यच वाटले.  म्हणून मुद्दाम जवळ जाऊन पाहिले तर बुच नसून काहीतरी वेगळेच झाड आहे हे लक्षात आले.  दोन्ही बाजूला 2 पाकळ्या, त्यातून बाहेर आलेले 4-5 तंतू व दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये असलेली एक पिटुकली पाकळी असे याचे एकूण रुपडे. फुले रोपाच्या टोकावर आलेली, त्यामुळे माथा पांढरा दिसत होता. नेहमीप्रमाणे निसर्गप्रेमी मैत्रिणींचा आधार घेतला.  शांकलीने लगेच शोधून clerodendrum incisum वर शिक्कामोर्तब केले.   याला  Rotheca incisa, Clerodendrum macrosiphon, Clerodendrum dalei वगैरे नावांनीही ओळखले जाते. याच्या पाकळ्या म्युझीकल नोट्स सारख्या दिसतात म्हणून याला म्युझिकल नोट्स प्लांट असेही म्हणतात.  काही जणांना ह्या पाकळ्या हडळीच्या जिभेसारख्या वाटतात, तर काहीजणांना मॉर्निंग किस सारख्या.  जशी वृत्ती तशी दृष्टी!    फुले थोडीशी कडू मेंदी उर्फ clerodendrum inermes सारखी दिसतात.  चुलत भावंडेच म्हणा ☺️☺️ मूळ आफ्रिकेतून आलेली ही वनस्पती भारतात