पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मग मी मूर्ख कसा?

माझे सातवीपर्यंतचे शिक्षण पालिकांच्या शाळांत झाले.  शिक्षणाचे माध्यम मराठी व्यतिरिक्त अजून काही असू शकते, स्टेट बोर्ड व्यतिरिक्त अजून काही बोर्ड असतात वगैरे माहीत असायचा प्रश्न नव्हताच.  शाळा निवडताना घराच्या जवळ हा एकमेव निकष होता.  सावंतवाडीत, एल्फिन्स्टन रोडच्या घरी किंवा नंतर सांताक्रूझला आल्यावरही ह्याच निकषावर माझी शाळा निवडली गेली.   त्या वेळी साधारण मध्यमवर्गीय लोक, ज्यांच्या घरी शिक्षणाचे वारे वाहात असे, असे लोक मुलांना खासगी शाळांत घालत.  त्यामुळे पालिकांच्या शाळेत बहुतांश निम्न मध्यमवर्गीयांची मुले येत.  बहुतेकांच्या घरी शिक्षणाचे वातावरण नसे.  मुलांनी अभ्यास सोडून इतर कसलीही पुस्तके वाचलेली नसत, तोंडची भाषा अशुद्ध असे, अभ्यासात फारशी गती नसे. अशा मुलांमध्ये माझ्यासारखे मोजके अपवाद, ज्यांच्या घरी शिक्षण हा महत्वाचा विषय असे, जे शालेय पुस्तकांव्यतिरिक्त इतर अवांतर वाचन करीत असत ते वेगळे उठून दिसत.  वासरातल्या लंगड्या गायीच जणू! सध्या पालिकांच्या शाळा कशा चालतात याबद्दल मला काही सांगता येणार नाही कारण तिथे शिकणारे कोणी परिचयात नाही.  पण तेव्हा पालिका शाळांत चांगले शिक्षण