पोस्ट्स

एप्रिल, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मलेशिया भेट - 3 : लव्हेंडर फार्म

इमेज
स्ट्रॉबेरी फार्मच्या बाजूलाच लव्हेंडर फार्म होते.  लव्हेंडर फार्मबद्दल वाचलेच नव्हते.   पण फुले दिसली कि एक चक्कर मारल्याशिवाय राहवत नाही म्हणून माझी पावले तिथे वळली आणि आतला नजारा पाहून थक्क झाले. तिथली फुले पाहून नजरेचे पारणे फिटणे  म्हणजे काय त्याचा अनुभव घेतला.   एकदम पैसा वसूल.  नाव लव्हेंडर फार्म असले तरी तिथे हर प्रकारची फुले होती.  लव्हेंडरचा एक तुकडा होता पण खरा बहर सुरु व्हायला वेळ होता.   पण तिथे असलेली इतर फुले इतकी बहरली होती कि त्यापुढे लव्हेंडरचा बहर बघायला ना मिळाल्याचे दुःख झाले नाही. लव्हेंडरचा इतकाच बहर होता आणि त्याच्या पुढे एकेक वाफा असा बहरला होता कि किती फोटो काढू असे झाले मला.....

मलेशिया भेट - 2 : स्ट्रॉबेरी लेइजर फार्म

इमेज
गेंटिंग हायलँड फिरून तंगड्या बऱ्यापैकी मोडल्यावर आम्ही स्ट्रॉबेरी लेइजर फार्मकडे मोहरा वळवला. फार्म अतिशय सुंदर होते.   '८ रिंगेला १०० ग्राम स्ट्रॉबेरी, तीही स्वतःच्या हाताने तोडून'   हि भानगडच एकदम चित्ताकर्षक होती. (मलेशियात पाय टाकताच मी १ रिंगे म्हणजे १७ रुपये हा हिशोब डोक्यातून काढून टाकला.  त्यामुळे ८ रिंगेला १०० ग्राम वस्तूची तुलना मी आपल्याकडे ८ रुपयाला काय मिळते ह्याच्याशी करून वस्तू स्वस्त कि महाग हे ठरवायचे.  अर्थात शास्त्रीय दृष्ट्र्या हे बरोबर नाहीये, पण मला सोयीचे पडले. )  पण शहाणपण दाखवून आणि उगीच सगळ्यांनी एकदम खड्ड्यात पडायला नको म्हणून फक्त माधवीनेच स्ट्रॉबेरी तोडायचे ठरले. त्याप्रमाणे एक बास्केट आणि कैची घेऊन आम्ही फार्म मध्ये पाऊल टाकले.  फार्ममध्ये फारशी गर्दी नव्हती. लोक स्ट्रॉबेरी तोडून बास्केटातच टाकताहेत, स्वतःच्या तोंडात टाकत नाहीयेत हे पाहायला जागोजागी कॅमेरे तर लावलेले होतेच पण बांगलादेशी दिसणारा एका बाबा पण तिथे उभा होता. आमच्या मलेशिया प्रवासात सोबत ऋषी असल्याचा आम्हाला खूप फायदा झाला.  तो स्वतः आसामात स्थायिक झालेला बंगाली, वयाच्या १

मलेशिया भेट - १ - गेंटिंग हायलँड

इमेज
परदेश प्रवास करावा असे सगळ्यांना वाटत असते, मलाही वाटत होते पण माझ्या डोक्यातल्या परदेशाच्या यादीत मलेशियाचे नाव कधी आले नाही.  हिंदी चित्रपटात कायम युरोप आणि तिथली बर्फ़ाच्छादित शिखरे पाहिल्याने परदेश म्हणजे युरोप हेच कुठेतरी डोक्यात होते.  पण ऐशूच्या आत्याने म्हणजे माधवीने मलेशियाला येणार का म्हणून विचारल्यावर डोक्यात  किडा फिरायला लागला. ऐशूने वेळ नाही सांगत यायला नकार दिल्यावर खरेतर मीही नाही म्हणूनच सांगितले होते.  पण नंतर म्हटले कि परत कधी संधी मिळणार अशी?  जायला मिळतेय तर जाऊन येऊया.  आईला म्हटले कि तुही चल.   परत कधी जायची संधी  मिळेल माहित नाही,  आता मिळतेय तर आईलाही फिरवून आणू म्हटले. प्रवासाची पूर्वतयारी अशी फारशी काही केली नाही.  कुठे फिरणार याबद्दल माधवीचे आधीच ठरले होते.  तिच्या ओळखीचे एकजण तेव्हा नुकतेच जाऊन आलेले आणि त्यांनी हॉटेल्स व फिरायची स्थळे सांगितलेली.  त्याप्रमाणे विमान तिकिटे बुक केली.   मुंबई ते कुआलालूंपूर,   कुआलालूंपूर ते  पेनांग,  लंकावी ते कुआलालूंपूर आणि तिथून परत मुंबई अशी तिकिटे काढून  झालेली.  फक्त पेंनांग ते लंकावी तिकीट काढायचे होते.  हॉटेले बु