पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

म्युझिकल नोट्स प्लांट Clerodendrum Incisum

इमेज
काल ऑफिसच्या आवारात फिरताना दुरून हे 1फुटी झुडूप दिसले.  लांबून फुले मला बुचाच्या फुलांसारखी वाटली.  बुच तर वृक्ष आहे त्यामुळे थोडे आश्चर्यच वाटले.  म्हणून मुद्दाम जवळ जाऊन पाहिले तर बुच नसून काहीतरी वेगळेच झाड आहे हे लक्षात आले.  दोन्ही बाजूला 2 पाकळ्या, त्यातून बाहेर आलेले 4-5 तंतू व दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये असलेली एक पिटुकली पाकळी असे याचे एकूण रुपडे. फुले रोपाच्या टोकावर आलेली, त्यामुळे माथा पांढरा दिसत होता. नेहमीप्रमाणे निसर्गप्रेमी मैत्रिणींचा आधार घेतला.  शांकलीने लगेच शोधून clerodendrum incisum वर शिक्कामोर्तब केले.   याला  Rotheca incisa, Clerodendrum macrosiphon, Clerodendrum dalei वगैरे नावांनीही ओळखले जाते. याच्या पाकळ्या म्युझीकल नोट्स सारख्या दिसतात म्हणून याला म्युझिकल नोट्स प्लांट असेही म्हणतात.  काही जणांना ह्या पाकळ्या हडळीच्या जिभेसारख्या वाटतात, तर काहीजणांना मॉर्निंग किस सारख्या.  जशी वृत्ती तशी दृष्टी!    फुले थोडीशी कडू मेंदी उर्फ clerodendrum inermes सारखी दिसतात.  चुलत भावंडेच म्हणा ☺️☺️ मूळ आफ्रिकेतून आलेली ही वनस्पती भारतात

फुलोनकी घाटी - जोशीमठ.

इमेज
रात्री झोप अशी काही लागली नाही. तिनालाच जाग आली. साडेतिनला दरवाजावर थाप पडली, चहा घ्या म्हणून.   चहा घेऊन, सगळे आवरून, पॅक लंच घेऊन पावणे सहाला निघालो. ब्रेकफास्ट गाडीतच होणार होता. उत्तराखंड हिमालयाचा पायथा व आजूबाजूला पसरलेल्या भागात आहे.  उत्तर बाजू हिमालयात येते, उत्तरखंडातली सगळी उंच शिखरे म्हणजे नंदादेवी, बद्रीनाथ, कामेत ह्या भागात येतात.  तिथले सगळ्यात उंच शिखर नंदादेवी साधारण 7800 मीटर उंचीवर आहे. म्हणजे जवळ जवळ 25,000 फूट.  दक्षिणेला शिवालीक रेंज आहे. जिम कॉर्बेटचा प्रसिद्ध कुमाऊं भाग यात येतो. याच्या खालच्या टोकाला दलदलीचा तराई भाग येतो. आमच्या ह्या सफरीत आम्ही हरिद्वार-ऋषिकेश पासून सुरवात करून फुलोनकी घाटी-हेमकुंड साहिब करणार होतो व पुढे बद्रीनाथला जाणार होतो.  हरिद्वार-ऋषिकेश समुद्रसपाटी पासून साधारण 1,200 फूट उंचीवर आहे, फुलोनकी घाटी 12,000 फुट उंचीवर तर हेमकुंड साहिब 15,000 फूट उंचीवर आहे. चारधामातले बद्रीनाथ त्या मानाने खाली आहे,  10,800 फूट उंची. 1200 फुट उंचीवरून सुरवात करून आमचा पहिला टप्पा होता जोशीमठ 6,150 फूट उंचीवर. ऋषिकेश ते जोशिमठ अंतर फक्त 250 किमी

फुलोनकी घाटी - ऋषिकेश.

इमेज
दिल्ली सोडल्यानंतर गाडी जरी थांबत थांबत, इतर गाड्यांना खो देत निघाली तरी हरिद्वारला मात्र वेळेत म्हणजे   1 वाजता पोचली.  हरिद्वारला उतरल्यावर गर्मीने नको जीव झाला. स्टेशनबाहेर पडताच नेहमीप्रमाणे रिक्षावाल्यानी घेराव घातला.  ऋषिकेशच्या आमच्या पत्त्यावर पोचवायचे एकाने 600 सांगितले. मी 400 वर सौदा करायचा प्रयत्न केला पण तो 500 वर हटून बसला.  तसे बघितले तर एसटी स्टँड समोरच होता पण गाड्या त्या दिवशी जरा उशिराने धावताहेत ही माहिती एका पोलिसाने दिली. आधीच एसटी लेट, म्हणजे तौबा गर्दी असणार, त्यात इतके सामान घेऊन एसटीने जरी गेलो तरी ऋषीकेश एसटी स्टँडवरून इच्छित स्थळी परत रिक्षानेच जावे लागले असते.  त्यामुळे उगीच कुठे पैशांचे तोंड बघत बसणार असा विचार करून एका रिक्षावाल्यासोबत 450 रु फिक्स केले व निघालो. हरिद्वार ते ऋषिकेश शेअर रिक्षाने गेल्यास माणशी 35 रुपये पडतात म्हणे. पण 35 रुपयात प्रवास करायचा असेल तर 6 माणसांची क्षमता असलेल्या जागेत 10 जणांना बसावे लागते. आम्ही तिघी आणि आमचे सामान यानेच रिक्षा भरून गेलेली ☺.  अजून कोणी सवारी घेणार नाही रिक्षावाल्याने सांगितले, त्यावर भरोसा ठेवत भयाण जोरदार

फ़ुलोंकी घाटी - प्रस्तावना.

इमेज
फ़ुलोंकी घाटीबद्दल खूप काही ऐकून होते, खूप काही वर्षांपासून.  काही वर्षांपासून आपणही जावे वाटायला लागले. काही स्वप्ने स्वप्नेच राहणार हे माहीत असते पण काही स्वप्ने प्रत्यक्षात उतरु शकतात हेही माहीत असते. हिमालयात फिरावे हे असेच एक स्वप्न आहे. पण बर्फयुक्त थंडी अजून कधीच अनुभवली नाहीये.जिथे उभा जन्म गेला त्या मुंबईत 20 डिग्री तापमान झाले की लगेच स्वेटर घालून त्या थंडीला मी पळवून लावते. तिथे 2 आणि 3 डिग्रीमध्ये काय निभाव लागणार? म्हणून आता हळूहळू सुरवात करून थंडीचा अनुभव घ्यायचा ठरवलंय. अंतिम लक्ष्य कैलास मानसरोवर यात्रा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरात नेटवर युथ हॉस्टेलचे कार्यक्रम पाहत होते, मनालीला एक सुंदर ट्रेक होता  जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान. त्या काळात तिथे बर्फ पण पडते.  पडणारे हिम बघणे हेही एक स्वप्न आहेच.  म्हणून बुकिंग करायचे ठरवले पण जीएसटीची हाफीसात इतकी हवा सुरू झाली आणि कोणीही सुट्टी घ्यायची नाही याचीही इतकी चर्चा व्हायला लागली की शेवटी बुकिंग मनातल्या मनात रद्द केले.  हा निर्णय चुकीचा ठरला हे नंतरचे... 😢😢 त्याचवेळी युथ हॉस्टेलचा फुलोनकी घाटीचा ट्रेक नजरेला पड