पोस्ट्स

जुलै, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आंबोली Revisited....

इमेज
ब-याच वर्षांनी या वर्षी प्रथमच गणपतीच्या पहिल्या दिवशी आंबोलीला जायचा योग आला.  गणपती फक्त निमित्त होते, पावसाळ्या नंतरची आंबोली बरीच वर्षे पाहिली नव्हती ती पाहायची होती.   आणि किती सुंदर दिसली माझी  आंबोली.....  तिथे काढलेले हे काही फोटो मोबाईलवरुन काढल्याने थोडेसे धुसर आलेत, शिवाय फुलेही इतकी लहान होती की कितीही प्रयत्न केला तरी फोकस होतच नव्हता.  

सकाळचा वॉक

इमेज
हल्ली रोज नियमाने चालायला जाते.  पारसिक टेकडीवर रोज काहीतरी नवीन दृष्टीस पडते. असेच काही फोटो आठवणीसाठी

पाऊस

यंदा पाऊस  व्यवस्थित पडतोय.  उगीच भसाभसा ओतून सगळे वाहून गेलेय असे करत नाहीय तर थांबून थांबून पोटभर पडतोय.  मुंबई स्पेशल गाडी बंद वगैरे प्रकार अजून केले नाहीयेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळीकडे पडतोय. असाच पडत राहा बाबा .....

व्यसन, छंद, टाईमपास.....

इमेज
इंटरनेट ऑफिसात उपलब्ध झाल्यापासून मला त्याचा छंद जडला.  ऑफिसात फुकट मिळायला लागण्याआधीपासून माझ्या घरी व्हिएसेनेलची इंटरनेट सेवा होती. पण इंटरनेटची गंमत मला माहित नव्हती. त्याचा वापर फक्त इमेल पाठवण्याकरता होत असे.  कधीतरी इंटरनेट एक्सप्लोरर उघडून बघायचे पण बातम्या वाचण्यापलीकडे कधी मजल गेली नाही.  काय बघायचे हेच माहीत नव्हते तर ... ऑफिसात लिखित मेमोजचा जमाना संपला आणि इंट्रानेट सुरु झाले.  इंट्रानेट सोबत इंटरनेट कधी आले ते लक्षात नाही पण बहुतेक दोन्ही एकदमच सुरु झाले असावे.  तेव्हा व्हॉट्सअप नव्हते त्यामुळे मित्रमंडळ इमेलवरून संदेशवहन करायचे. तो जमाना हॉटमेल, याहू वगैरेचा होता.  याहू ग्रुप्स फेमस व्हायला सुरुवात झालेली. निडोकिडोज हा एक अतिशय फेमस याहू ग्रुप होता.  बहुतेक सगळे फोर्वर्ड्स ह्या ग्रुपवर जन्माला यायचे.  माझ्या जुन्या पुराण्या बॅकअप वर यांच्या ढिगाने मेल्स सापडतील. तर माझी इंटरनेट सुरवात अशी आधी मेल्स मग याहू ग्रुप्स पासून झाली.  फोर्वर्ड्सवर क्लिक करता करता इंटरनेट हा एक मोठा खजिना आहे हे लक्षात येऊ लागले. मला वाटते मी नेट माहितीसाठी म्हणून 2005-2006 पासून वापरायला ला