पोस्ट्स

पारसिक हिल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

इमेज
हल्ली माझे चालणे खूप कमी झालेय.  पहिल्यासारखे नियमित जाणे होत नाही व त्यामुळे ह्या ऋतूत पारसिक हिलवर फुलणारी फुले पाहिली गेली नाही. असेच एकदा चुकून चालायला गेले होते.  आदल्या दिवशी जिप्सीने अडुळश्याची फुले व्हाट्सअप्प ग्रुपवर टाकली होती. टेकडीवर अडुळसा कुठे आहे हे मला माहित आहे म्हणून विचार केला की आपणही एक फेरी मारून फोटो काढावेत.  अडुळश्याचे फोटो काढून परत रस्त्यावर येत असताना एका लहान झाडाने लक्ष वेधून घेतले.  झाडाची उंची साधारण सहा ते सात फूट होती व अगदीच बाळ झाड वाटत होते.  लक्ष गेले ते त्याच्या फुलांमुळे.  अगदी पिटुकली, माचीस काडीच्या डोक्याएव्हढी फुले बघून लगेच फोटो घ्यायला सुरुवात केली. घरी गेल्यावर थोडी शोधाशोध केली तेव्हा कळले की हा लघु अजान. बोटॅनिकल नाव इहरेटिया लेविस.  Ehretia Laevis. ह्या बोटॅनिकल नावांची एक गंमत आहे. झाडाचे नाव व झाडाची पहिल्यांदा नोंद करणारी व्यक्ती या दोघांचीही गुंफण नावात घातलेली असते.  जॉर्ज  डायनिसिअस एऱ्हेट या बोटॅनिकल कलाकाराने पहिली नोंद केली म्...

ऋतू

इमेज
सध्या वर्षाऋतु अगदी जोशात सुरु आहे. मला खरेतर मुंबईचा पावसाळा अजिबात आवडत नाही.  पण नव्या मुंबईत मात्र पावसाळा सुसह्य आहे.  आमची पारसिक टेकडी मस्त हिरवीगार झालीय.  पावसामुळे गेल्या आठवड्यात गेले नाही पण आता मात्र नो दांडी.  निसर्ग कधीच आळशीपणा करत नाही मग आपण तरी का करावा? माझ्या लाडक्या पारसिक टेकडीचे काही फोटो.     पारसिक हिलवर एक जोडपे नियमित येते.  मी त्यांना कलर कॉ ऑर्डिनेटेड कपल म्हणते.  दोघेही नेहमी सारख्याच रंगाचे कपडे घालतात.