पोस्ट्स

जानेवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मै भी शेतकरी अर्थात माझे शहरी शेतीचे प्रयोग.

इमेज
गेली १५ वर्षे मी माझ्या छोट्याशा गच्चीत काहीनाकाही रुजवण्याचे उद्योग करत आहे. आधी कुंडीतुन सुरवात केली. एकेक करता करता शंभरेक कुंड्या जमल्या. तेव्हा शोभेच्या झाडांची जास्त हौस होती. गुलाब, जास्वंद, अबोली, शेवंती, बोगनवेल हे खास आवडीचे विषय होते. एका वेळेस तर आठ प्रकारच्या जास्वंदी माझ्या बागेत सुखाने नांदत होत्या. आपल्याला खायला काही मिळेल असे पिकवायचे डोक्यात कधी आले नाही. सगळे काही हौसेखातर होत असल्याने फक्त पैसे भरपुर जायचे. आणलेल्या रोपांमधली काही लिमिटेड आयुष्य घेऊन येत. ती बिचारी आपले आयुष्य संपले की निमुट जात. दीर्घायुष्यी रोपे जगत. माझे लक्ष असायचे पण कामात कधी वेळ मिळे न मिळे. त्यात माझा स्वभाव अतिशय लहरी. आली लहर की तासनतास खुरपे घेऊन खुरपत बसायचे. नाही तर महिनोन महिने दुर्लक्ष. एकदा पेपरात वाशीच्या गुणे कुटूंबाबद्दल वाचले. त्यांनी त्यांच्या घरी अगदी उसापासुन सगळे लावलेले. पेपरातल्या बातमीमध्ये दिलेला त्रोटक पत्ता घेऊन घर शोधुन काढले आणि त्यांना भेटले. त्यांनी गांडूळे वापरुन गच्चीत शेती केलेली. फळभाज्या, पालेभाज्या, केळी, अंजीर, चिकु, सिताफळे, कलिंगड

२०१६ - एक मैलाचा दगड!!!!!

या वर्षी ब-याच गोष्टी करायचे ठरवले आहे.   या वर्षी घडणारी  सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे ऐशुचे ग्रेजुएशन. १०+२+३ या साच्यातून  बाहेर पडुन आयुष्याची सुरवात करायची वेळ आलीय.  गेल्या नोवेंबरात मिलिंद पराडकर आणि कुमुद कानिटकरांबरोबर अंबरनाथचे शिव मंदिर पाहायला गेलो होतो.  तिथे बोलता बोलता त्यांनी एक खूप छान  गोष्ट सांगितली.  त्या म्हणाल्या की पदवी  शिक्षण पुर्ण झाल्यावर दीक्षांत समारंभ असतो.    त्याचा अर्थ अभ्यासाचा अंत हा नाही तर कोणीतरी  तुमच्या समोर बसून तुम्हाला शिकवणार आणि मग ते तुम्ही शिकणार या पद्धतीचा  अंत.   यापुढे तुम्हाला कोणी शिकवणार नाही तर तुमचे तुम्ही स्वत: शिकायला लागायचे.   दीक्षांत  झाला म्हणजे असे स्वत:च स्वत: शिकायला तुम्ही तयार झालात. १०+२+३ साचा पार पडल्यावर पुढे काय ह्या प्रश्नावर गेले वर्षभर काथ्याकुट चालू आहे.   तिला सध्या शिकवणा-या शिक्षकांच्या  मते मुंबईत पोस्ट ग्रजुएशन अजिबात करू नये. मग आता मुंबई नाहीतर निदान पुणे तरी चालावे.  इतिहास ह्या विषयासाठी सगळ्यात चांगले विद्यापीठ दिल्लीचे जे एन यु. असे शिक्षकांचे म्हणणे .  पण दिल्लीचा इतिहास पाहता तिथे इतिहास शि

मावळत्या दिनकरा......

इमेज
रोज अनुदिनी  लिहायची म्हणते तरीही शेवटची  पोस्ट ऑगस्ट मधली…… मावळत्या दिनकराला  नमस्कार करून नवीन वर्षाची सुरवात ….