बसंत है आया रंगिला..

नित्यनेमाने परत एकदा वसंताचे आगमन झालेले आहे. कंटाळा हा शब्द निसर्गाच्या शब्दकोशात बहुतेक नसावा.  सगळे कसे ठरल्याबरहुकूम पार पडत असते.


वसंत यायच्या कित्येक दिवस आधीच आमच्या इथे कोकीळ लोक आपले घसे साफ करायला घेतात.   बाकि इतर पक्षी असतातच म्हणा. त्यांचे वर्षभर कुजन  सुरूच असते.


रॉबिन तर फेमस आहेच, तो ठासून सांगतो वर्षभर का गायचे ते.....


Robin :

Robin sang sweetly 
When the days were bright
'Thanks, thanks for summer,' 
He sang with all his might. 


Robin sang sweetly, 
In the autumn days,
'There are fruits for everyone;
Let all give praise.' 


In the cold and wintry weather,
Still hear his song,
'Somebody must sing,' said Robin 
'Or winter will seem long.' 


When the spring came back again,
He sang, 'I told you so! 
Keep on singing through the winter 
It will always go.' 



कोकीळ नोव्हेंबर उजाडला कि डागडुजी करायला घेतो त्याचा गळा. एकेक अर्धवट लकेर घेत घेत गळा तयार होत जातो. सकाळी साडेचारला पक्ष्यांचा दिवस सुरु होतो.  खरेतर अनेक पुस्तकांमधून पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने दिवसाची सुंदर सुरवात झाली असं वाचलंय. पण माझ्या बाबतीत मात्र उलट आहे.  कानी किलबिलाट पडतोय म्हणजे ऊबदार अंथरुण सोडून उठायची  वेळ झाली.. सकाळी लवकर उठणे मला काही फारसे रुचत नाही.  पण तरीही उठावे लागते हे वेगळे. :)

तर अशा ह्या मधुर वसंत ऋतूत पक्षी, झाडे सगळं निसर्गच आपले best  foot forward घेऊन उभा राहतो.  अशा ह्या वसंतकालीन ऋतूची काही दृश्ये... 







































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda

मग मी मूर्ख कसा?