मलेशिया भेट - १ - गेंटिंग हायलँड
परदेश प्रवास करावा असे सगळ्यांना वाटत असते, मलाही वाटत होते पण माझ्या डोक्यातल्या परदेशाच्या यादीत मलेशियाचे नाव कधी आले नाही. हिंदी चित्रपटात कायम युरोप आणि तिथली बर्फ़ाच्छादित शिखरे पाहिल्याने परदेश म्हणजे युरोप हेच कुठेतरी डोक्यात होते. पण ऐशूच्या आत्याने म्हणजे माधवीने मलेशियाला येणार का म्हणून विचारल्यावर डोक्यात किडा फिरायला लागला. ऐशूने वेळ नाही सांगत यायला नकार दिल्यावर खरेतर मीही नाही म्हणूनच सांगितले होते. पण नंतर म्हटले कि परत कधी संधी मिळणार अशी? जायला मिळतेय तर जाऊन येऊया. आईला म्हटले कि तुही चल. परत कधी जायची संधी मिळेल माहित नाही, आता मिळतेय तर आईलाही फिरवून आणू म्हटले.
प्रवासाची पूर्वतयारी अशी फारशी काही केली नाही. कुठे फिरणार याबद्दल माधवीचे आधीच ठरले होते. तिच्या ओळखीचे एकजण तेव्हा नुकतेच जाऊन आलेले आणि त्यांनी हॉटेल्स व फिरायची स्थळे सांगितलेली. त्याप्रमाणे विमान तिकिटे बुक केली. मुंबई ते कुआलालूंपूर, कुआलालूंपूर ते पेनांग, लंकावी ते कुआलालूंपूर आणि तिथून परत मुंबई अशी तिकिटे काढून झालेली. फक्त पेंनांग ते लंकावी तिकीट काढायचे होते. हॉटेले बुक करायची होती. जायचे होते नोव्हेंबर मध्ये पण वरील तिकिटे आम्ही बहुतेक मे कि जुनमध्येच काढलेली. बाकी हॉटेल बुकिंग वगैरे करायचा मात्र खूप कंटाळा केला. एका दृष्टिने ते बरेच झाले. जायला साधारण दिड महिना उरला असताना माधवीचा नवरा ऋषीला ठरवलेल्या तारखा जमणार नसल्याचे लक्षात आले. त्याने तिकिटे एक आठवडा पुढे ढकलून घेतली. २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर असा ट्रिप प्लॅन आखला आणि मग मात्र अगदी गम्भीरपणे वीसा , हॉटेल, परदेशी चलन वगैरेंच्या मागे लागलो. हॉटेल बुकिंग.कॉम वरून बुक केली . हॉटेलांबद्दल टिप्स आधीच मिळालेल्या पण प्रत्यक्ष साईटवर पाहून त्यात बदल करून हॉटेल्स बुक केली. पेनांग ते लंकावी बोटीनेही जाता येते, माझी इच्छा होती बोटीने जायची पण ऋषीला बोट जमण्यासारखी नव्हती म्हणून शेवटी एअर एशियाचे विमान तिकीट बुक केले. हि एअरलाइन अतिशय खत्रूड आहे. वेळेत सुटण्याचे नाव नाही आणि वर पैसेही खूप जास्त चार्ज करते.
व्हिसा १ महिना आधी काढायचा होता आणि त्यासाठी मुख्य अट बँक खात्यात रु. ३०,००० असावेत ही होती. त्यानुसार मी माझी सगळी कागदपत्रे गोळा करून एजेंटला द्यायला माधवीकडे दिली पण आईची मात्र आज करू, उद्या करू करत शेवटी ७ नोव्हेंबरला तिची कागदपत्रे विसा एजेंट कडे पाठवली गेली. (व्हिसा आपला आपणपण करता येतो पण ते करायला वेळ नव्हता म्हणून एजेंट) तिचे बँक अकाउंट बघताच एजेंटला अकाउंटवर झालेली स्पेलिंग मिस्टिक दिसली. आईच्या आडनावात एम ऐवजी एन लिहिले गेले होते आणि त्यामुळे आडनाव मेस्त्री चे नेस्त्री झालेले. माधवी मला म्हणाली कि दुसऱ्या दिवशी ती बँकेत माणूस पाठवून अकाउंटवरचे नाव बदलून घेईल. त्यासाठी पासबुक असले तर बरे होईल. आईकडे पासबुक नव्हते, ते होते भावाकडे. आई ८ नोव्हेंबरला सकाळी भावाकडे पासबुक घ्यायला गेली. मी त्याला पासबुकवर काय नाव आहे ते बघायला सांगितले. ते नेमके नेस्त्री निघाले. आधीचे जुने पासबुक काढून पाहिले, त्यावरही नेस्रीच. इतकी वर्षे कोणाच्याही हे लक्षात आले नव्हते. कॅनरा बँकेच्या रेकॉर्डमध्ये आईचे आडनाव नेस्त्री असेच होते आणि आता बँक एका दिवसात हि गडबड ठीक करणे अशक्यप्राय होते. नशिबाने आईचे स्टेट बँकेतसुद्धा खाते होते पण गेली सहा महिने त्यावर काहीही व्यवहार नव्हते, खात्यात बॅलन्ससुद्धा साधारण २४-२५,००० होता. आईला म्हटले लगेच खात्यात पाच सहा हजार टाकून ते ३०,००० होतील असे कर आणि त्यांच्याकडून स्टेटमेंट स्टॅम्प मारून घे. सुदैवाने आईकडे घरात तेवढी रक्कम होती. बँक त्या दिवशी ३०,००० च्या बॅलन्स वर स्टॅम्प मारून देणार नाही असा माधवीचा अंदाज होता पण स्टेट बॅन्केतल्या बाईंना आईने सगळी कथा ऐकवल्यावर त्यांनी पैसे जमा करून घेतले आणि लगेच स्टेटमेंट पण दिले. त्या बाईंचे आभार मानत आईने सगळे कागद लगेच व्हिसासाठी पाठवून दिले. आई वाकोल्याला, भाऊ पार्ल्यात, बँक परत वाकोल्याला, आई तशा चकरा मारतेय, मी नव्या मुंबईत ऑफिसात, माधवी अंधेरीला तिच्या ऑफिसात आणि एजेंट मुंबई सिटीत असे सगळे दिवसभर फोनाफोनी करत कामे करत होतो. ८ तारखेला रात्री अनपेक्षितपणे नोटबंदीची घोषणा झाली तेव्हा लक्षात आले नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळ्या बँकात गर्दी उसळली तेव्हा ८ तारखेला आमचे बँकेचे सगळे व्यवहार पार पडले नसते तर किती मोठा गोंधळ झाला असता हे लक्षात आले. जर ८ तारखेला काम झाले नसते तर दुसऱ्या दिवशीच्या गोंधळ गर्दीत आईकडे पाहायला बँकेत कोणाला वेळही मिळाला नसता. नशीब जोरावर म्हणून ८ तारखेला आईचे काम चुटकीसरशी झाले.
त्यानंतर परदेशी चलन, इन्शुरन्स वगैरे सगळे सोपस्कार करून आम्ही एकदाचे २४ ला रात्री ११ चे मलिंडो एअर लाईनचे विमान पकडले. माझा आणि आईचा हा पहिलाच परदेश प्रवास पण ऋषीला नेहमीचा. त्यामुळे त्याने 'लवकर जाऊया नाहीतर नंतर इमिग्रेशन ला खूप गर्दी होते' म्हणत आम्हाला ८ वाजताच विमानतळावर बोलावले. विमानतळ आणि इमिग्रेशनला अगदी शुकशुकाट होता. अर्ध्या तासात इमिग्रेशनसकट सगळे आटपले. नोटबंदीचा परिणाम म्हणत आम्ही ड्युटी फ्री दुकाने बघत अडीज तास काढले.
२५ तारखेला सकाळी ६-६.३० वाजता कुआलालूंपूर विमानतळावर उतरलो. इमिग्रेशन वगैरे सगळे आरामात पार करून एअर पोर्टवरून टॅक्सी घेऊन हॉटेलवर आलो.
आम्ही जिथे २ रात्री राहिलो ते हॉटेल ग्रँड सिजन्स . नावाप्रमाणे एकदम ग्रँड होते. सुरेख लॉबी, चांगल्या लिफ्ट्स, चांगल्या व्हूज असणाऱ्या, दोन माणसांना अगदी कोंबल्यासारख्या वाटणार नाहीत अशा खोल्या, स्वच्छ टॉयलेट्स, बेड्स, चहा कॉफीची सोयआणि इस्त्री करायची सोय. मला हॉटेल आणि खोल्या प्रथमदर्शनी आवडल्या. तिथला नोकरवर्गही बरा होता. दोन रात्रींसाठी दोन माणसांना ४८३ रिंगे मला योग्य वाटले.
मातोश्री
हॉटेलच्या दारातून दिसणारे पेट्रोनास टॉवर्स
संध्याकाळी फिरायला जायच्या आधी....
हॉटेल चेक इन वगैरे करेतो आम्ही आजूबाजूला चौकशी सुरु केली. कुठे जायचेय हे आम्हाला माहित होते पण कसे जायचे ते शोधायचे होते .
हॉटेल लॉबीमध्ये फिरणाऱ्या एका टॅक्सीवाल्याने आम्हाला हेरले आणि ३०० रिंगेमध्ये गेंटिंग हायलँडला नेऊन आणतो म्हणत आम्हाला फितवले. त्याच्याशी घासाघीस करून २५० रिंगे मध्ये आम्ही त्याला पटवले. खोल्यांमध्ये सामान टाकून अगदी आनंदाने गेंटिंगला निघालो.
मला गेंटिंगच्या कॅसिनो, राईड्समध्ये वगैरे अजिबात रस नव्हता पण त्याच्या आजूबाजूला असलेल्या स्ट्रॉबेरी फार्म, मशरूम फार्म, हनिबी फार्म इत्यादी ठिकाणांमध्ये रस होता. तिथे पोचल्यानंतर आजूबाजूला जरा फिरल्यावर लक्षात आले कि दिवसभराची टॅक्सी बुक करायची काहीच गरज नव्हती. गरज पडेल तशी हात दाखवून टॅक्सी बुक करून फिरलो असतो तर जवळजवळ निम्म्या पैश्यात काम झाले असते. पहिल्या अनुभवाने आम्हाला शहाणे केले म्हणत उगीच दुःख वगैरे न करता मस्त एन्जॉय करायच्या कामाला लागलो.
गेंटिंग हायलँड हि एक प्रचंड मोठी प्रॉपर्टी आहे, समुद्र सपाटीपासून जवळ जवळ पावणे सहाहजार फूट उंचीवर वसलेल्या या जागी कॅसिनो, थिम राइड्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स असे बरेच काय काय आहे. बाहेरून अगदी हाई फाय दिसणारे कॅसिनो आम्ही फक्त बाहेरूनच पाहिले. एका कॅसिनोत आत जाऊन नेमका काय असतो हा प्रकार हेही डोळ्याखालून घालून घेतले. थिम राइड्स २०१७ पर्यंत बंद होत्या. तसेही कॅसिनो पाहून झाल्यावर राइड्स पाहण्याचा फारसा उत्साह राहिला नाही, राइड्स करण्याचा तर प्रश्नच नव्हता. आमच्यापैकी कोणालाही त्यात रस नव्हता.
गेंटिंगला वर गोंडोला लिफ्टने जावे लागते. गच्च जंगलावरून ह्या गोंडोला लिफ्ट आपल्याला अलगद घेऊन जातात. त्याला तिथे स्कायवे म्हणतात. खाली गाडी ठेवायची आणि स्कायवेने वर जायचे. तिथले स्कायवे खूप फास्ट आहेत. साधारण ५-१० मिनिटात तुम्ही वर पोहोचता. खालच्या फोटोत जोडी जोडीने जे दिसतेय ते आहेत गोंडोला. व्ही शेप घेत लांबवर गेलाय हा आभाळातील रस्ता. लांबवर पहा जोड्या दिसताहेत.
लोकांना घेऊन ये जा करणारे गोंडोला आणि हे सहज करणारी गोंडोला लिफ्ट व तिचे मजबूत स्टीलचे दोरखंड.
स्कायवेला तोलून धरणा-या खांबांभोवती अशी सुरेख नक्षी काढलेली वरून दिसत होती.
हि झाडे खूप उंच होती, फोटोत वाटत नाहीयेत. गोंडोलामधून फोटो घेतलेत. खालची जमीन अजिबात दिसत नाही.
गेंटिंग हायलँडला गोंडोलातून बाहेर पडल्यावर एकदम एसीमध्ये आल्यासारखे वाटले. खाली शहरात तापमान आपल्या मुंबईसारखेच होते पण ५७०० फूट वर आल्यावर एकदम आल्हाददायक थंड हवा अनुभवायला मिळाली. तिथल्या इतर जागांविषयी काय बोलणार! नावाप्रमाणे सगळे एकदम झकपक तर होतेच पण तेवढेच महागही.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrxWEsqlWvdca0OWSlha9vfGcFSd2fR_W3x1p24ftDj7XHKof4O4JouOGjR8ZH4GU6HBUASVpBg4q87etDXeoXOz2sZKr-GF5E0_U9_W2jNhrIG5hdyhFYmZChYTi5B3hTLfJ5xDA0NTk/s640/IMG-20161126-WA0002.jpg)
दोन रेनडिअर आणि गिफ्ट्स दिसल्या म्हणून हे ख्रिसमस डेकोरेशन असावे असा अंदाज.
हे पांढुरके गोल बहुतेक आपले नीर फणस असावेत. मला कापायची पद्धत आवडली.
आम्ही जिथे २ रात्री राहिलो ते हॉटेल ग्रँड सिजन्स . नावाप्रमाणे एकदम ग्रँड होते. सुरेख लॉबी, चांगल्या लिफ्ट्स, चांगल्या व्हूज असणाऱ्या, दोन माणसांना अगदी कोंबल्यासारख्या वाटणार नाहीत अशा खोल्या, स्वच्छ टॉयलेट्स, बेड्स, चहा कॉफीची सोयआणि इस्त्री करायची सोय. मला हॉटेल आणि खोल्या प्रथमदर्शनी आवडल्या. तिथला नोकरवर्गही बरा होता. दोन रात्रींसाठी दोन माणसांना ४८३ रिंगे मला योग्य वाटले.
लॉबी मधली पुष्परचना
मातोश्री
हॉटेलच्या दारातून दिसणारे पेट्रोनास टॉवर्स
संध्याकाळी फिरायला जायच्या आधी....
हॉटेल लॉबीमध्ये फिरणाऱ्या एका टॅक्सीवाल्याने आम्हाला हेरले आणि ३०० रिंगेमध्ये गेंटिंग हायलँडला नेऊन आणतो म्हणत आम्हाला फितवले. त्याच्याशी घासाघीस करून २५० रिंगे मध्ये आम्ही त्याला पटवले. खोल्यांमध्ये सामान टाकून अगदी आनंदाने गेंटिंगला निघालो.
मला गेंटिंगच्या कॅसिनो, राईड्समध्ये वगैरे अजिबात रस नव्हता पण त्याच्या आजूबाजूला असलेल्या स्ट्रॉबेरी फार्म, मशरूम फार्म, हनिबी फार्म इत्यादी ठिकाणांमध्ये रस होता. तिथे पोचल्यानंतर आजूबाजूला जरा फिरल्यावर लक्षात आले कि दिवसभराची टॅक्सी बुक करायची काहीच गरज नव्हती. गरज पडेल तशी हात दाखवून टॅक्सी बुक करून फिरलो असतो तर जवळजवळ निम्म्या पैश्यात काम झाले असते. पहिल्या अनुभवाने आम्हाला शहाणे केले म्हणत उगीच दुःख वगैरे न करता मस्त एन्जॉय करायच्या कामाला लागलो.
गेंटिंग हायलँड हि एक प्रचंड मोठी प्रॉपर्टी आहे, समुद्र सपाटीपासून जवळ जवळ पावणे सहाहजार फूट उंचीवर वसलेल्या या जागी कॅसिनो, थिम राइड्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स असे बरेच काय काय आहे. बाहेरून अगदी हाई फाय दिसणारे कॅसिनो आम्ही फक्त बाहेरूनच पाहिले. एका कॅसिनोत आत जाऊन नेमका काय असतो हा प्रकार हेही डोळ्याखालून घालून घेतले. थिम राइड्स २०१७ पर्यंत बंद होत्या. तसेही कॅसिनो पाहून झाल्यावर राइड्स पाहण्याचा फारसा उत्साह राहिला नाही, राइड्स करण्याचा तर प्रश्नच नव्हता. आमच्यापैकी कोणालाही त्यात रस नव्हता.
गेंटिंगला वर गोंडोला लिफ्टने जावे लागते. गच्च जंगलावरून ह्या गोंडोला लिफ्ट आपल्याला अलगद घेऊन जातात. त्याला तिथे स्कायवे म्हणतात. खाली गाडी ठेवायची आणि स्कायवेने वर जायचे. तिथले स्कायवे खूप फास्ट आहेत. साधारण ५-१० मिनिटात तुम्ही वर पोहोचता. खालच्या फोटोत जोडी जोडीने जे दिसतेय ते आहेत गोंडोला. व्ही शेप घेत लांबवर गेलाय हा आभाळातील रस्ता. लांबवर पहा जोड्या दिसताहेत.
लोकांना घेऊन ये जा करणारे गोंडोला आणि हे सहज करणारी गोंडोला लिफ्ट व तिचे मजबूत स्टीलचे दोरखंड.
स्कायवेला तोलून धरणा-या खांबांभोवती अशी सुरेख नक्षी काढलेली वरून दिसत होती.
हि झाडे खूप उंच होती, फोटोत वाटत नाहीयेत. गोंडोलामधून फोटो घेतलेत. खालची जमीन अजिबात दिसत नाही.
गेंटिंग हायलँडला गोंडोलातून बाहेर पडल्यावर एकदम एसीमध्ये आल्यासारखे वाटले. खाली शहरात तापमान आपल्या मुंबईसारखेच होते पण ५७०० फूट वर आल्यावर एकदम आल्हाददायक थंड हवा अनुभवायला मिळाली. तिथल्या इतर जागांविषयी काय बोलणार! नावाप्रमाणे सगळे एकदम झकपक तर होतेच पण तेवढेच महागही.
आत खूप झकपक केलेली आहे. मस्त टाइमपास होतो.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrxWEsqlWvdca0OWSlha9vfGcFSd2fR_W3x1p24ftDj7XHKof4O4JouOGjR8ZH4GU6HBUASVpBg4q87etDXeoXOz2sZKr-GF5E0_U9_W2jNhrIG5hdyhFYmZChYTi5B3hTLfJ5xDA0NTk/s640/IMG-20161126-WA0002.jpg)
हि फुले खरी होती कि खोटी होती आठवत नाही, खरीच असावीत बहुतेक.
दोन रेनडिअर आणि गिफ्ट्स दिसल्या म्हणून हे ख्रिसमस डेकोरेशन असावे असा अंदाज.
कॅसिनोबाहेरच एवढा थाटमाट होता कि आम्ही आत जायचे धाडस केलेच नाही.
तरीही एक कॅसिनो आतून बघितलाच. उत्सुकता होती ना इतकी, कि कसे काय असते तिथे म्हणून...
आत इतका आवाज आणि प्रकाश होता कि कधी बाहेर पडतोय असे झाले. काही लोक विशेषतः साठीच्या आसपासचे लोक तिथे ठिय्या मांडून बसलेले. हे लोक म्हणे फक्त खेळण्यासाठीच इथे येतात. इतका आवाज कसे काय सहन करत असतील देव जाणे.
या व्यतिरिक्त तिथे शॉपिंग मॉल्स वगैरेहि खूप होते. पण किंमती खुप जास्त वाटल्या. मी आपले फोटो काढायचे काम करत होते. शॉपिंग हा माझा आवडता छंद नाहीय. :)
या दुकानात इतर अनेक गोष्टींबरोबर काचेच्या अतिशय सुरेख वस्तू होत्या.
इथे बहुतेक चायनीस सूप होते. माझ्यासोबतची मंडळी फक्त भारतीय जेवणाच्या प्रेमात असल्याने मला गप्प बसावे लागले. चिनी लोक बोलमधून काहीतरी खातपित होते.
खादाडीचे स्टॉल पण भरपूर होते. मला नाईलाजाने इतरांबरोबर भारतीय जेवण खावे लागले.
ते हिरवे ऍस्परॅगस असावेत किंवा कुठल्यातरी भाजीचे देठ असतील. ऑर्डर प्रमाणे धडाधड जेवण बनत होते.
हे पांढुरके गोल बहुतेक आपले नीर फणस असावेत. मला कापायची पद्धत आवडली.
बाहेरचा परिसर सुद्धा अगदी नयनरम्य होता. तिथे अर्धा दिवस घालवून आम्ही परत स्कायवेने खाली आलो. खाली स्ट्रॉबेरी पार्क वगैरे इतर आकर्षणे वाट पाहात होती.
टिप्पण्या