मलेशिया भेट - 3 : लव्हेंडर फार्म
स्ट्रॉबेरी फार्मच्या बाजूलाच लव्हेंडर फार्म होते. लव्हेंडर फार्मबद्दल वाचलेच नव्हते. पण फुले दिसली कि एक चक्कर मारल्याशिवाय राहवत नाही म्हणून माझी पावले तिथे वळली आणि आतला नजारा पाहून थक्क झाले. तिथली फुले पाहून नजरेचे पारणे फिटणे म्हणजे काय त्याचा अनुभव घेतला. एकदम पैसा वसूल. नाव लव्हेंडर फार्म असले तरी तिथे हर प्रकारची फुले होती. लव्हेंडरचा एक तुकडा होता पण खरा बहर सुरु व्हायला वेळ होता. पण तिथे असलेली इतर फुले इतकी बहरली होती कि त्यापुढे लव्हेंडरचा बहर बघायला ना मिळाल्याचे दुःख झाले नाही.
लव्हेंडरचा इतकाच बहर होता
आणि त्याच्या पुढे एकेक वाफा असा बहरला होता कि किती फोटो काढू असे झाले मला.....
लव्हेंडरचा इतकाच बहर होता
आणि त्याच्या पुढे एकेक वाफा असा बहरला होता कि किती फोटो काढू असे झाले मला.....
टिप्पण्या