२०१६ - एक मैलाचा दगड!!!!!

या वर्षी ब-याच गोष्टी करायचे ठरवले आहे.   या वर्षी घडणारी  सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे ऐशुचे ग्रेजुएशन. १०+२+३ या साच्यातून  बाहेर पडुन आयुष्याची सुरवात करायची वेळ आलीय. 


गेल्या नोवेंबरात मिलिंद पराडकर आणि कुमुद कानिटकरांबरोबर अंबरनाथचे शिव मंदिर पाहायला गेलो होतो.  तिथे बोलता बोलता त्यांनी एक खूप छान  गोष्ट सांगितली.  त्या म्हणाल्या की पदवी  शिक्षण पुर्ण झाल्यावर दीक्षांत समारंभ असतो.    त्याचा अर्थ अभ्यासाचा अंत हा नाही तर कोणीतरी  तुमच्या समोर बसून तुम्हाला शिकवणार आणि मग ते तुम्ही शिकणार या पद्धतीचा  अंत.   यापुढे तुम्हाला कोणी शिकवणार नाही तर तुमचे तुम्ही स्वत: शिकायला लागायचे.   दीक्षांत  झाला म्हणजे असे स्वत:च स्वत: शिकायला तुम्ही तयार झालात.


१०+२+३ साचा पार पडल्यावर पुढे काय ह्या प्रश्नावर गेले वर्षभर काथ्याकुट चालू आहे.   तिला सध्या शिकवणा-या शिक्षकांच्या  मते मुंबईत पोस्ट ग्रजुएशन अजिबात करू नये. मग आता मुंबई नाहीतर निदान पुणे तरी चालावे.  इतिहास ह्या विषयासाठी सगळ्यात चांगले विद्यापीठ दिल्लीचे जे एन यु. असे शिक्षकांचे म्हणणे .  पण दिल्लीचा इतिहास पाहता तिथे इतिहास शिकण्यासाठी जायची अजिबात इच्छा नाहीय ऐशुला.  म्हणजे आता पुण्याला जाणे आले.


बरे पुण्याला जायचे तर होस्टेलमध्ये अजिबात राहणार नाही असे आधीच ठरवले गेलेय. तर आता बघुया  पुढे काय होते ते.  तिच्याबरोबर मलाही जावे लागते की काय पुण्याला देव जाणे.


तर असो.  ही फक्त सुरवात आहे.   या वर्षी करायच्या अनंत गोष्टीमधली एक.


तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे निदान या वर्षी तरी हंपी  बघून   होईल ही आशा.   गेले कित्येक वर्षे हंपीला जायचे म्हणतेय.   या वर्षी जमेल तर बरे होईल.


 या खेरीजही  अजून ब-याच गोष्टी आहेत. 


सध्या तरी इतकेच लिहिलेले बरे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda

मग मी मूर्ख कसा?