मेरी आवाज सुनो
आज ऑफिसला दांडी मारली. कालपासुन डोके मायग्रेनमुळे दुखत होते. त्याला थोडा आराम द्यावा म्हणुन आज सुट्टी घेतली. आज नेहमीसारखे काम काढायचा अजिबात मुड नव्हता. मग लॅपटॉपवर युट्युबवर गाणी लावली. हा माझा नेहमीचा उद्योग आहे. गाणी लावुन ठेवायची आणि कामे करत बसायचे. वाटले तर एखादे गाणे पाहायचे. आज मोहम्मद रफीची गाणी लावलेली. प्लेलिस्टमध्ये सगळी शांतरसाची गाणी होती. हळूवार प्रेमगीते होती सगळी. बहुतेक सगळी देवचीच होती. :) गाणी ऐकत, सोबत गुणगुणत, मध्येच व्हॉट्साप, मायबोली इत्यादी करत टाईमपास चाललेला. अचानक एक गाणे कानावर पडले. मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो.... हे गाणे मी आधी ऐकलेय. कुठे?कधी? काहीच आठवत नाही. पाहिल्याचे तर अजिबातच नाही. तरीही हे गाणे मी कायम गुणगुणत असते. फक्त सुरवातीच्या दोन ओळीच मला माहित आहेत आणि त्याच नेहमी गुणगुणते. मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो, मेरी आवाज सुनो. हे गाणे पाहायची संधी पहिल्या...