आंबोली भेट






मे महिन्यात चक्क 2 वेळा आंबोलीला जायचा योग आला. शेत हाच विषय दोन्ही भेटीचे कारण असले तरी आंबोली म्हटले की जीवाला उगीचच बरे वाटायला लागते. मेच्या सुरवातीला गेले तेव्हा शेतातली करवंदे खायला मिळणार हेही एक आकर्षण होतेच.  साधारणपणे गावाजवळ असलेल्या करवंदाच्या जाळ्या पोरधाडीपासून वाचत नाहीत पण शेत गावापासून लांम्ब असल्याने शेतातल्या जाळ्या बचावल्या आणि मला रानमेवा चाखता आला. 

बाकी शेतात यंदा काजू म्हणावे तसे आले नाहीत. फेब्रुवारीत गेले तेव्हा बहर खूप आलेला दिसला होता पण आता बहुतेक फुलें जळालेली दिसली.   फुले का जळाली असावीत याच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे म्हणजे पुढच्या वर्षी ती कारणे टाळता येतील.


या वर्षीपासून शेत करायचे ठरवले आहे. शून्य खर्चात नैसर्गिक शेती ही सुभाष पाळेकर गुरुजींची कल्पना वापरून शेती करायची. रासायनिक खते अजिबात वापरायची नाहीत वगैरे ठरवले आहे.  माझे शेत गेले काही वर्षे पडीकच असल्यामुळे मुळात जमिनीत रसायने नाहियेत. पण पाळेकर गुरुजींच्या कल्पनेप्रमाणे शेती करण्यात माझयासाठी एक मोठा अडसर म्हणजे देशी गायीची उपलब्धता.  गुरुजींची शेती पूर्णपणे देशी गायीच्या शेणावर या गोमूत्रावर अवलंबून आहे.  देशी गाय आंबोलीत कुठेही नाही. ती मिळवणे आणि तिला सांभाळणे हे माझयासाठी एक मोठे चॅलेंज आहे.  बघूया कसे काय निभावले जाते ते. ज्या ईश्वराने शेती करायची प्रेरणा दिली तोच हाताला धरुन शेती करवून घेईल. त्यामुळे उगीच भलत्या चिंता करायच्या नाहीत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda

मग मी मूर्ख कसा?