पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिन्हे नाझ है हिंद पर वो कहां है????

इमेज
रोज स्त्री वरील अत्याचाराच्या इतक्या भयाण बातम्या येताहेत कि आजची बातमी वाचली कि काल याच्यापेक्षा मवाळ वाटायला लागतो.  कालच्यापेक्षा आज नीचतम पातळी गाठलेली दिसते.  अशा वेळी 50 वर्षांपूर्वी लिहिलेलं हे गाणं परत परत आठवत रहातं. ये बीवी भी है और बहन भी है, माँ भी मदद चाहती है ये हव्वा की बेटी यशोदा की हमजिंस, राधा की बेटी पयम्बर की उम्मत, ज़ुलेखां की बेटी जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं ये कूचे, ये नीलामघर दिलकशी के ये लुटते हुए कारवाँ ज़िन्दगी के कहाँ हैं, कहाँ है, मुहाफ़िज़ ख़ुदी के जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं? ये पुरपेच गलियाँ, ये बदनाम बाज़ार ये ग़ुमनाम राही, ये सिक्कों की झन्कार ये इस्मत के सौदे, ये सौदों पे तकरार जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं? ये सदियों से बेख्वाब, सहमी सी गलियाँ ये मसली हुई अधखिली ज़र्द कलियाँ ये बिकती हुई खोखली रंग-रलियाँ जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं? वो उजले दरीचों में पायल की छन-छन थकी-हारी साँसों पे तबले की धन-धन ये बेरूह कमरों में खाँसी की ठन-ठन जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं? ये फूलों क...

निसर्ग

इमेज
मला निसर्गात राहायला आवडते.  सिमेंटच्या जंगलात मी गुदमरते.  नशिबाने माझ्या आजूबाजुला निसर्ग मुक्तपणे बागडत आहे.  माझ्या खिडकीतून दिसणारा निसर्ग.....

ऋतू

इमेज
सध्या वर्षाऋतु अगदी जोशात सुरु आहे. मला खरेतर मुंबईचा पावसाळा अजिबात आवडत नाही.  पण नव्या मुंबईत मात्र पावसाळा सुसह्य आहे.  आमची पारसिक टेकडी मस्त हिरवीगार झालीय.  पावसामुळे गेल्या आठवड्यात गेले नाही पण आता मात्र नो दांडी.  निसर्ग कधीच आळशीपणा करत नाही मग आपण तरी का करावा? माझ्या लाडक्या पारसिक टेकडीचे काही फोटो.     पारसिक हिलवर एक जोडपे नियमित येते.  मी त्यांना कलर कॉ ऑर्डिनेटेड कपल म्हणते.  दोघेही नेहमी सारख्याच रंगाचे कपडे घालतात.

आंबोली Revisited....

इमेज
ब-याच वर्षांनी या वर्षी प्रथमच गणपतीच्या पहिल्या दिवशी आंबोलीला जायचा योग आला.  गणपती फक्त निमित्त होते, पावसाळ्या नंतरची आंबोली बरीच वर्षे पाहिली नव्हती ती पाहायची होती.   आणि किती सुंदर दिसली माझी  आंबोली.....  तिथे काढलेले हे काही फोटो मोबाईलवरुन काढल्याने थोडेसे धुसर आलेत, शिवाय फुलेही इतकी लहान होती की कितीही प्रयत्न केला तरी फोकस होतच नव्हता.  

सकाळचा वॉक

इमेज
हल्ली रोज नियमाने चालायला जाते.  पारसिक टेकडीवर रोज काहीतरी नवीन दृष्टीस पडते. असेच काही फोटो आठवणीसाठी

पाऊस

यंदा पाऊस  व्यवस्थित पडतोय.  उगीच भसाभसा ओतून सगळे वाहून गेलेय असे करत नाहीय तर थांबून थांबून पोटभर पडतोय.  मुंबई स्पेशल गाडी बंद वगैरे प्रकार अजून केले नाहीयेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळीकडे पडतोय. असाच पडत राहा बाबा .....

व्यसन, छंद, टाईमपास.....

इमेज
इंटरनेट ऑफिसात उपलब्ध झाल्यापासून मला त्याचा छंद जडला.  ऑफिसात फुकट मिळायला लागण्याआधीपासून माझ्या घरी व्हिएसेनेलची इंटरनेट सेवा होती. पण इंटरनेटची गंमत मला माहित नव्हती. त्याचा वापर फक्त इमेल पाठवण्याकरता होत असे.  कधीतरी इंटरनेट एक्सप्लोरर उघडून बघायचे पण बातम्या वाचण्यापलीकडे कधी मजल गेली नाही.  काय बघायचे हेच माहीत नव्हते तर ... ऑफिसात लिखित मेमोजचा जमाना संपला आणि इंट्रानेट सुरु झाले.  इंट्रानेट सोबत इंटरनेट कधी आले ते लक्षात नाही पण बहुतेक दोन्ही एकदमच सुरु झाले असावे.  तेव्हा व्हॉट्सअप नव्हते त्यामुळे मित्रमंडळ इमेलवरून संदेशवहन करायचे. तो जमाना हॉटमेल, याहू वगैरेचा होता.  याहू ग्रुप्स फेमस व्हायला सुरुवात झालेली. निडोकिडोज हा एक अतिशय फेमस याहू ग्रुप होता.  बहुतेक सगळे फोर्वर्ड्स ह्या ग्रुपवर जन्माला यायचे.  माझ्या जुन्या पुराण्या बॅकअप वर यांच्या ढिगाने मेल्स सापडतील. तर माझी इंटरनेट सुरवात अशी आधी मेल्स मग याहू ग्रुप्स पासून झाली.  फोर्वर्ड्सवर क्लिक करता करता इंटरनेट हा एक मोठा खजिना आहे हे लक्षात येऊ लागले. मला वाटते मी नेट म...

घावणे...

इमेज
रोज नाश्ता काय हा प्रश्न असतोच.  आज ऐशूची फर्माईश झाली, घावणे कर म्हणून.  माझे घावणे कधी बरे होतात, कधी नाही.  नेहमी तांदूळ भिजवून घावणे करते मी, पण त्याला पूर्वतयारी लागते.  एकदोनदा विकतच्या तयार पिठाचे केले पण नीट सुकलेच नाहीत.  त्यामुळे घावणे कर हा हुकूम आल्यावर जरा धास्तावलेच. गेल्याच आठवड्यात तांदूळ धुवून, सुकवून, दळून आणलेले.  तेच काढले आणि देवाचे नाव घेऊन एका वाटीचे घावणे बनवले.  खाणारणीचे नशीब थोर असल्याने चांगले झाले. घावण्याचा विषय निघाला कि नेहमी आजीची म्हणजे ऐशूच्या पणजीची आठवण निघतेच.  ऐशूला तिच्या हातचे घावणे खूप आवडतात.  गावी गेलो कि एकदा तरी तिच्या हातचे घावणे ऐशू खातेच.  त्याचे असे झाले कि बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा आंबोलीला गेलेलो. आजी एके दिवशी डब्यात घावणे घेऊन भेटायला आली.  अर्थात तिने तिच्या मुलीसाठी आणलेले. तिच्या मुलीने ते स्वतःच्या मुलीला दिले,  त्या मुलीने ते आपल्यामुलीला दिले. अशा  तऱ्हेने घावणे ऐशूपर्यंत पोचले खरे,  पण तिच्या मते पणजीने ते स्वतःच्या चेडवा करता आणलेले, तिच्याकरता नाही. ...

मै भी शेतकरी अर्थात माझे शहरी शेतीचे प्रयोग.

इमेज
गेली १५ वर्षे मी माझ्या छोट्याशा गच्चीत काहीनाकाही रुजवण्याचे उद्योग करत आहे. आधी कुंडीतुन सुरवात केली. एकेक करता करता शंभरेक कुंड्या जमल्या. तेव्हा शोभेच्या झाडांची जास्त हौस होती. गुलाब, जास्वंद, अबोली, शेवंती, बोगनवेल हे खास आवडीचे विषय होते. एका वेळेस तर आठ प्रकारच्या जास्वंदी माझ्या बागेत सुखाने नांदत होत्या. आपल्याला खायला काही मिळेल असे पिकवायचे डोक्यात कधी आले नाही. सगळे काही हौसेखातर होत असल्याने फक्त पैसे भरपुर जायचे. आणलेल्या रोपांमधली काही लिमिटेड आयुष्य घेऊन येत. ती बिचारी आपले आयुष्य संपले की निमुट जात. दीर्घायुष्यी रोपे जगत. माझे लक्ष असायचे पण कामात कधी वेळ मिळे न मिळे. त्यात माझा स्वभाव अतिशय लहरी. आली लहर की तासनतास खुरपे घेऊन खुरपत बसायचे. नाही तर महिनोन महिने दुर्लक्ष. एकदा पेपरात वाशीच्या गुणे कुटूंबाबद्दल वाचले. त्यांनी त्यांच्या घरी अगदी उसापासुन सगळे लावलेले. पेपरातल्या बातमीमध्ये दिलेला त्रोटक पत्ता घेऊन घर शोधुन काढले आणि त्यांना भेटले. त्यांनी गांडूळे वापरुन गच्चीत शेती केलेली. फळभाज्या, पालेभाज्या, केळी, अंजीर, चिकु, सिताफळे, कलिंगड...