नि:शंक - मायबोलीवरून
मायबोलीवर वाचताना बहुतेक वेळा माझ्याकडून लेखकाचे नाव आधी पाहिले जाते. नंतर लेखन प्रकार पाहिला जातो. मग हाती असलेल्या वेळानुसार याआधी ज्यांचे लिखाण वाचलेय आणि आवडलेय अशांचे वाचले जाते. कधीतरी सहज म्हणून पण काहीतरी वाचले जाते. लेखनप्रकार गजल किंवा कविता असेल तर सहसा उघडले जात नाही. पण ललित असेल आणि शीर्षक थोडे वेगळे वाटले तर कधीकधी उघडले जाते. "नि:शंक" हे नाव शीर्षक वाचून काही बोध होईना. बघू तरी काय आहे हे ललित म्हणून लेख उघडला. पहिले दोन तीन तुकडे वाचून काहीतरी प्रेमाचे आहे असे वाटले आणि मधले सोडत भरभर खाली आले. प्रेमाचे काहीतरी वाचायचा आता कंटाळा आलाय. म्हणजे लिहिणा-यांनी लिहू नये असे काही नाही. काही जण खरेच चांगले लिहितात. पण मी आता ते वाचायच्या कक्षेतून बाहेर आलेय बहुतेक. प्रेमाच्या गोड गोड गोष्टी वाचताना मला त्यानंतरच्या कडू कडू गोष्टी जास्त आठवायला...