गारंबीची बी
आज अकस्मात गारंबीची बी पहावयास मिळाली. हिला गायरी असेही म्हणतात. ह्याची जी वेल असते ती साधीसुधी नसते तर महावेल असते. शास्त्रीय भाषेत Liana म्हणतात त्या प्रकारची प्रचंड वेल, जी साधारण जंगलात उंच वृक्षांवर चढलेली आढळते. ह्याची शेंगही काही फूट लांब असते. अजून ही वेल प्रत्यक्ष पहायचे भाग्य मला लाभलेले नाही. शास्त्रीय नाव Entanda rheedii किंवा Entanda Puesartha. एप्रिल २०२२चा अपडेट : मी वर लिहिलेय कि हा वेल मला अजून पाहायला मिळाला नाहीय. तेव्हा पाहिला नव्हता पण आता पाहिलेला आहे. आंबोलीत कायमच्या मुक्कामाला आल्यावर आंबोली घाटातून सावंतवाडी फेऱ्या वाढल्या. अशाच एका फेरीत मला एका १० मजली झाडावर काहीतरी टांगलेले दिसले. इतक्या उंचीवर दिसतेय म्हणजे कुठल्यातरी मोठ्या पक्ष्याने घरट्यासाठी म्हणून मोठे फडके नेऊन तिथे टाकले असणार असे मला वाटले. पण तरी खात्री करण्यासाठी म्हणून पुढच्या वेळेस दुर्बीण घेऊन गेले व बघते तर...