पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुभाषितमाला

सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः । अर्धेन कुरुते कार्यम् सर्वनाशो न जायते ॥ विनाश जवळ आल्यावर बुद्धिमान अर्ध्याचा त्याग करतात (अर्ध्यागोष्टी सोडून देतात) आणि (राहिलेल्या) अर्ध्यामधे काम भागवतात, त्यामूळे सर्वनाश होत नाही. न कश्चिदपि जानाति किं कस्य श्वो भविष्यति । (अतः श्वः करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान् ॥ कोणाचे कधी काय होईल हे कोणालाच माहीत नसते. म्हणून हुशार माणसाने कामे लगेच करावी (उगाच कर्तव्यात चालढकल करू नये.) (संकलित)

सुभाषितमाला

लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः। कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेन् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत्॥                                नीतीशतक,  राजा भर्तृहरी. {राजा भर्तृहरिकृत नीतीशतक मूर्खपद्धति विषयविभाग.} वृत्त : पृथ्वी अर्थ :-               (मनुष्याने एकवेळ) प्रयत्नपूर्वक वाळू रगडली अथवा पिळली तर त्यातून कदाचित तेलही मिळेल, (अथवा) तहानेने व्याकूळ झालेला माणूस आपली तहान मृगजळाच्या पाण्याने देखील भागवू शकेल, वणवण भटकणार्‍या (एखाद्याला) फिरतां फिरतां चुकून कदाचित सशाचें शिंगसुद्धां सापडेल. (इतक्या सर्व अशक्य गोष्टी वाटणार्‍या गोष्टीही कदाचित साध्य होतील) परन्तु पुर्वाग्रही, हट्टी, हेकट अश्या मूर्खाची समजूत घालणे मात्र (कधीही, कोणालाही) शक्य होणार नाही. हे सुभाषित वाचताच मराठी बांधवांना वामनपंडिताने या श्लोकाचा मराठीत केलेला काव्यानुवाद लगेच आठवतो. तो म्हणजे, 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे'. ...