माझ्या बकेट लिस्टचा प्रवास
बकेट लिस्ट हा शब्दप्रयोग मला अगदी अलीकडच्या काळात कळला. त्या आधी माझ्या फक्त इच्छा होत्या. इच्छा हा शब्दही मी चुकीचाच वापरतेय. जे काही होते त्यातल्या काहीना मुंगेरीलाल के हसीं सपने म्हणायला हवे. थिंक बिग ड्रिम बिग वगैरे मोटीवेशनल स्पिकरवाल्यांच्या बाता कानांना कितीही गोड वाटल्या तरी जर्रा फुलके आफताब नही होता हेच खरे. कित्येक इच्छा मनात चक्कर मारुन गेल्या. काही टिकल्या, काही विरल्या. काही पुर्त झाल्या, काहींची अपुर्तता आजही काळजात कळ ऊमटवते तर काही इच्छा नुसत्या आठवल्या तरी ‘ बाल बाल बच गयी मै...’ हे फिलींग येऊन आपण किती सुखात आहोत याची जाणिव मन को बाग बाग बना देती है.. काही सुप्त, काही अतीसुप्त तर काही दिवसातुन दहा वेळा तोंडुन वदल्या जात होत्या. सुप्त अतीसुप्तांचा मलाच पत्ता नव्हता. ज्या दिवसभर घोकल्या जात होत्या त्या प्रत्यक्षात न ऊतरण्याची हजार कारणे घरचे लगेच दाखवुन देत होते. (आमच्याकडे ह्या बाबतीत अजिबात हयगय केली जात नाही). तर अशीच टेरेस फ्लॅटची इच्छा मनात सुप्तावस्थेत होती. जमिनीपासुन वर कुठलाही मजला, घरातील प्रशस्त हॅाल व त्याच्या समोर अतीप्रशस्त अशी टेरेस, त्यावर सुंदर झ...