पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फुलोनकी घाटी - जोशीमठ.

इमेज
रात्री झोप अशी काही लागली नाही. तिनालाच जाग आली. साडेतिनला दरवाजावर थाप पडली, चहा घ्या म्हणून.   चहा घेऊन, सगळे आवरून, पॅक लंच घेऊन पावणे सहाला निघालो. ब्रेकफास्ट गाडीतच होणार होता. उत्तराखंड हिमालयाचा पायथा व आजूबाजूला पसरलेल्या भागात आहे.  उत्तर बाजू हिमालयात येते, उत्तरखंडातली सगळी उंच शिखरे म्हणजे नंदादेवी, बद्रीनाथ, कामेत ह्या भागात येतात.  तिथले सगळ्यात उंच शिखर नंदादेवी साधारण 7800 मीटर उंचीवर आहे. म्हणजे जवळ जवळ 25,000 फूट.  दक्षिणेला शिवालीक रेंज आहे. जिम कॉर्बेटचा प्रसिद्ध कुमाऊं भाग यात येतो. याच्या खालच्या टोकाला दलदलीचा तराई भाग येतो. आमच्या ह्या सफरीत आम्ही हरिद्वार-ऋषिकेश पासून सुरवात करून फुलोनकी घाटी-हेमकुंड साहिब करणार होतो व पुढे बद्रीनाथला जाणार होतो.  हरिद्वार-ऋषिकेश समुद्रसपाटी पासून साधारण 1,200 फूट उंचीवर आहे, फुलोनकी घाटी 12,000 फुट उंचीवर तर हेमकुंड साहिब 15,000 फूट उंचीवर आहे. चारधामातले बद्रीनाथ त्या मानाने खाली आहे,  10,800 फूट उंची. 1200 फुट उंचीवरून सुरवात करून आमचा पहिला टप्पा होता जोशीमठ 6,150 फूट उंचीवर. ऋषिकेश...