फुलोनकी घाटी - ऋषिकेश.
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjl-zeuV0QpjiD4V2laQqlF_g1Zd_aPSQLL5Iz_m22Lkkm4gBXW34oI74fgSUK9hDnOURsiNz3FskU7ToB8tWzgqx3J7_Hvd3ilv2yXXnPFvB1HFuCxqgLuDC2XeLAq6MB1UeCsva7W6Ck/s400/IMG_20170901_180519.jpg)
दिल्ली सोडल्यानंतर गाडी जरी थांबत थांबत, इतर गाड्यांना खो देत निघाली तरी हरिद्वारला मात्र वेळेत म्हणजे 1 वाजता पोचली. हरिद्वारला उतरल्यावर गर्मीने नको जीव झाला. स्टेशनबाहेर पडताच नेहमीप्रमाणे रिक्षावाल्यानी घेराव घातला. ऋषिकेशच्या आमच्या पत्त्यावर पोचवायचे एकाने 600 सांगितले. मी 400 वर सौदा करायचा प्रयत्न केला पण तो 500 वर हटून बसला. तसे बघितले तर एसटी स्टँड समोरच होता पण गाड्या त्या दिवशी जरा उशिराने धावताहेत ही माहिती एका पोलिसाने दिली. आधीच एसटी लेट, म्हणजे तौबा गर्दी असणार, त्यात इतके सामान घेऊन एसटीने जरी गेलो तरी ऋषीकेश एसटी स्टँडवरून इच्छित स्थळी परत रिक्षानेच जावे लागले असते. त्यामुळे उगीच कुठे पैशांचे तोंड बघत बसणार असा विचार करून एका रिक्षावाल्यासोबत 450 रु फिक्स केले व निघालो. हरिद्वार ते ऋषिकेश शेअर रिक्षाने गेल्यास माणशी 35 रुपये पडतात म्हणे. पण 35 रुपयात प्रवास करायचा असेल तर 6 माणसांची क्षमता असलेल्या जागेत 10 जणांना बसावे लागते. आम्ही तिघी आणि आमचे सामान यानेच रिक्षा भरून गेलेली ☺. अजून कोणी सवारी घेणार नाही रिक्षावाल्याने सांगितले, ...