फ़ुलोंकी घाटी - प्रस्तावना.
फ़ुलोंकी घाटीबद्दल खूप काही ऐकून होते, खूप काही वर्षांपासून. काही वर्षांपासून आपणही जावे वाटायला लागले. काही स्वप्ने स्वप्नेच राहणार हे माहीत असते पण काही स्वप्ने प्रत्यक्षात उतरु शकतात हेही माहीत असते. हिमालयात फिरावे हे असेच एक स्वप्न आहे. पण बर्फयुक्त थंडी अजून कधीच अनुभवली नाहीये.जिथे उभा जन्म गेला त्या मुंबईत 20 डिग्री तापमान झाले की लगेच स्वेटर घालून त्या थंडीला मी पळवून लावते. तिथे 2 आणि 3 डिग्रीमध्ये काय निभाव लागणार? म्हणून आता हळूहळू सुरवात करून थंडीचा अनुभव घ्यायचा ठरवलंय. अंतिम लक्ष्य कैलास मानसरोवर यात्रा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरात नेटवर युथ हॉस्टेलचे कार्यक्रम पाहत होते, मनालीला एक सुंदर ट्रेक होता जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान. त्या काळात तिथे बर्फ पण पडते. पडणारे हिम बघणे हेही एक स्वप्न आहेच. म्हणून बुकिंग करायचे ठरवले पण जीएसटीची हाफीसात इतकी हवा सुरू झाली आणि कोणीही सुट्टी घ्यायची नाही याचीही इतकी चर्चा व्हायला लागली की शेवटी बुकिंग मनातल्या मनात रद्द केले. हा निर्णय चुकीचा ठरला हे नंतरचे... 😢😢 त्याचवेळी युथ हॉस्टेलचा फुलोनक...