पोस्ट्स

मार्च, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घावणे...

इमेज
रोज नाश्ता काय हा प्रश्न असतोच.  आज ऐशूची फर्माईश झाली, घावणे कर म्हणून.  माझे घावणे कधी बरे होतात, कधी नाही.  नेहमी तांदूळ भिजवून घावणे करते मी, पण त्याला पूर्वतयारी लागते.  एकदोनदा विकतच्या तयार पिठाचे केले पण नीट सुकलेच नाहीत.  त्यामुळे घावणे कर हा हुकूम आल्यावर जरा धास्तावलेच. गेल्याच आठवड्यात तांदूळ धुवून, सुकवून, दळून आणलेले.  तेच काढले आणि देवाचे नाव घेऊन एका वाटीचे घावणे बनवले.  खाणारणीचे नशीब थोर असल्याने चांगले झाले. घावण्याचा विषय निघाला कि नेहमी आजीची म्हणजे ऐशूच्या पणजीची आठवण निघतेच.  ऐशूला तिच्या हातचे घावणे खूप आवडतात.  गावी गेलो कि एकदा तरी तिच्या हातचे घावणे ऐशू खातेच.  त्याचे असे झाले कि बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा आंबोलीला गेलेलो. आजी एके दिवशी डब्यात घावणे घेऊन भेटायला आली.  अर्थात तिने तिच्या मुलीसाठी आणलेले. तिच्या मुलीने ते स्वतःच्या मुलीला दिले,  त्या मुलीने ते आपल्यामुलीला दिले. अशा  तऱ्हेने घावणे ऐशूपर्यंत पोचले खरे,  पण तिच्या मते पणजीने ते स्वतःच्या चेडवा करता आणलेले, तिच्याकरता नाही. ...